आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉलमध्ये भारताला कांस्य पदक, महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा आलोक पहिलाच खेळाडू
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आलोक तोडकरने महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
पुणे: आलोक तोडकरने महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. हे करताना तो महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा पहिलाच व्हॉलीबॉलपटू ठरला आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करताना आलोकने अपार कौशल्य, प्रबळ निर्धार आणि उत्कृष्ट संघभावना यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्याच्या असामान्य योगदानामुळे भारताला या स्पर्धेत मानाचे तिसरे स्थान मिळविता आले. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
आलोकचे आज पुणे विमानतळावर अमोल बुचडे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, अमेय कुलकर्णी तसेच अमोल बुचडे स्पोर्ट्सचे इतर खेळाडूंनी जल्लोष स्वागत केले. विमानतळवरून जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हा क्रीडा आधिकारी जगनाथ लकडे शिवाजी कोळी, अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तेथून श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेऊन धनकवडी येथे आप्पासाहेब रेणुसे यांनी प्रियदर्शनी या अलोकच्या शाळेत मोठ्या प्रमाणावर मुलांच्या त्याच्या शाळेतील शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 18, 2025 10:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉलमध्ये भारताला कांस्य पदक, महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा आलोक पहिलाच खेळाडू