advertisement

Sweetener : चहातल्या साखरेला करा गुडबाय, साखरेऐवजी नैसर्गिक गोड पर्यायांचा करा वापर

Last Updated:

मधुमेहाचा वाढता धोका पाहता, जास्त साखर असलेला चहा तब्येतीसाठी घातक ठरु शकतो. मधुमेहाचा धोका वाढतोच तसंच वजन वाढणं, त्वचा आणि हृदयरोग देखील यामुळे होऊ शकतो. यावर एक उपाय म्हणजे, साखर टाळूनही चहा गोड बनवू शकता. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर साखरेपेक्षा आरोग्यासाठी खूप चांगला आहे.

News18
News18
मुंबई : आपल्या देशात निमित्त काहीही असो किंवा नसो चहा होतोच. कारण भारतात चहा हे फक्त एक पेय नाही तर प्रत्येक घरातली प्रथा आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा दूर करण्याची वेळ असो, साखरेशिवाय चहा अनेकांना अपूर्ण वाटतो.
मधुमेहाचा वाढता धोका पाहता, जास्त साखर असलेला चहा तब्येतीसाठी घातक ठरु शकतो. मधुमेहाचा धोका वाढतोच तसंच वजन वाढणं, त्वचा आणि हृदयरोग देखील यामुळे होऊ शकतो. यावर एक उपाय म्हणजे, साखर टाळूनही चहा गोड बनवू शकता. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर साखरेपेक्षा आरोग्यासाठी खूप चांगला आहे.
advertisement
मध - चहा गॅसवरुन काढला की त्यानंतर त्यात मध घाला. जेणेकरून त्यातील पोषक घटकांचं नुकसान होणार नाही. यात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. वजन नियंत्रण आणि पचनासाठी देखील  मध फायदेशीर आहे. साखरेच्या प्रमाणात मध घाला.
गूळ - गूळ हा देशी आणि पौष्टिक पर्याय आहे. गावांगावांमधे गुळाचा चहा अजूनही दररोज केला जातो. गुळात लोह आणि खनिजं आहेत. चव नक्कीच वेगळी लागेल पण साखरेपेक्षा आरोग्यासाठी गूळ चांगला असं तज्ज्ञ सांगतात. पण, लक्षात ठेवा की गूळ घातल्यानंतर चहा जास्त उकळू नका.
advertisement
ज्येष्ठमध - आयुर्वेदात ज्येष्ठमधाचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. ज्येष्ठमध नैसर्गिकरित्या गोड असतो आणि खोकला आणि सर्दीमधे ज्येष्ठमध वापरल्यानं आराम मिळतो. दालचिनी आणि लवंग मिसळून हर्बल चहा बनवू शकता.
खजूर सरबत - खजूर सरबत खूप घट्ट आणि गोड असतं, त्यामुळे ते कमी प्रमाणात घाला. त्यात फायबर आणि खनिजं असतात यामुळे ऊर्जा वाढते.
advertisement
सुकामेवा - मनुका आणि खजूर वापरुन चहा करता येईल. दुधात मनुका आणि खजूर उकळून चहा बनवता येतो.
हा चहा नेहमीच्या चहापेक्षा पौष्टिक असेल.
खूप गोड चहा आवडत नसेल तर हे सर्वोत्तम पर्याय आहेत. म्हणजेच, चहाला गोड चव देण्यासाठी साखर हा एकमेव पर्याय नाही. मध, गूळ, ज्येष्ठमध, खजूर सरबत आणि सुकामेवा या पाच गोष्टींनी चहा गोड होईलच, पण आरोग्यालाही हानी होणार नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sweetener : चहातल्या साखरेला करा गुडबाय, साखरेऐवजी नैसर्गिक गोड पर्यायांचा करा वापर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement