Asia Cup 2025 : संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार? कॅप्टन सुर्याने स्पष्टच सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
युएई विरूद्ध अद्याप भारताने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली नाही आहे. त्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट नाही आहे.
Asia Cup 2025 : आजपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सूरूवात होत आहे.या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अफगाणिस्तान आणि हॉगकॉग हे संघ आमने सामने येणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा सामना युएईशी होणार आहे. या स्पर्धेत युएई विरूद्ध अद्याप भारताने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली नाही आहे. त्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट नाही आहे.त्यात आता टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने संजू सॅमसनबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.त्यावरून संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
खरं तर संजू सॅमसनची आशिया कपसाठी निवड झाली होती.त्यानंतर शुभमन गिलची देखील संघात निवड झाल्याने संजू सॅमसनला संघात धोका निर्माण झाला होता.गिलमुळे संजूला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवले जाईल अशी चर्चा सुरू होती.पण अखेर आता यावर सुर्याने उत्तर दिले आहे.
आशिया कप स्पर्धेपुर्वी कर्णधार सुर्यकुमार यादव यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सुर्याला विचारले, भारताकडे दोन विकेटकिपर फलंदाज आहेत, जितेश आणि संजू, पण माझा प्रश्न संजूबद्दल आहे, संजूला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल का? यावर सूर्यकुमार यादव म्हणाला,आम्ही खरोखर संजूची चांगली काळजी घेत आहोत, काळजी करू नका आम्ही उद्या योग्य निर्णय घेऊ,असे म्हणत त्याने उत्तर टाळले आहे. पण त्याच्या काळजी घेण्याच्या विधानाने संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल,अशी शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
रवी शास्त्रीच गंभीर ऐकणार?
संजू सॅमसन हा पहिल्या तीन खेळाडूंपैकी सर्वांत खतरनाक खेळाडू आहे. तो तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो.त्यामुळे त्याला त्याचाच स्थानी खेळवा असे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे. संजूच्या जागी शुभमन गिलला आणण तितकंस सोप्प नाही आहे. गिललाही हटवणे सोप्पे नाही आहे.गिल कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास येऊ शकतो ,त्यामुळे सॅमसनसाठी सलामीवीराचे स्थान सोडलं पाहिजे असे रवी शास्त्री यांनी सांगितले होते.
advertisement
दरम्यान संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे.संजू सॅमसन त्याच्या केरला क्रिकेट लीगमधील कोची ब्लू टायगर्स संघाला लिलावात मिळालेले पैसे भेट म्हणून दिले आहेत. संजू सॅमसन या लीगमधला सर्वांत महागडा खेळाडू होता. त्याला कोची ब्लू टायगर्स संघाने 26.60 कोटी रूपयांना खरेदी केले होते.आता हीच रक्कम त्याने आपल्या संघातील खेळाडूंना आणि कोंचिग स्टाफला भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसन चं कौतुक होत आहे.
advertisement
दरम्यान यंदाच्या हंगामात कोची ब्लू टायगर्सनी 75 धावांनी अरीस कोलम सेलर या संघाचा पराभूत करत केसीएलची ट्रॉफी जिंकली होती. या विजयासह कोची ब्लू टायगर्सला 30 लाखाची बक्षीस रक्कम मिळाली होती.त्यानंतर आता संजू सॅमसनने लिलावात मिळालेले 26.60 कोटी खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला दिले आहेत.त्यामुळे सॅमसनच्या निर्णयाचे आता कौतुक होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार? कॅप्टन सुर्याने स्पष्टच सांगितलं