Australia vs Zimbabwe : टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बॉब्वेकडून तगड्या ऑस्ट्रेलियाचा पराभव!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia vs Zimbabwe T20 WC : ऑस्ट्रेलियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध आत्तापर्यंत कधीच विजय मिळवता आला नाही. अशातच झिम्बॉब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
Australia vs Zimbabwe T20 WC : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधी सर्वात मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. झिम्बॉब्वे सारख्या लिंबू टिंबू संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेने नियमित 20 ओव्हर्समध्ये केवळ 2 विकेट्स गमावून 169 रन्सचा समाधानकारक स्कोअर बोर्डवर लावला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर ढेपाळली होती अन् पराभव स्विकारला आहे.
जॉश इंग्लीश, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांच्यासारखी मोठी नाव देखील खास कामगिरी करू शकली नाहीत. 29-4 अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियाची झाली आहे. कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांना तर भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी काहीवेळ झुंज दिली पण त्यांना देखील झिम्बॉब्वेविरुद्ध तोडीस तोड कामगिरी जमली नाही.
advertisement
ऑस्ट्रेलियाचं काय चुकलं?
झिम्बॉब्वेची आधीच पीचचा नूर ओळखला होता. झिम्बॉब्वे संघाने सुरूवातीपासून सिक्स आणि फोरची मदत घेतली नाही. ग्राऊंडची परिस्थिती पाहता त्यांनी धावत रन्स बोर्डवर लावल्या. त्यानंतर त्यांनी काही हलक्या बॉ़लवर शॉट्स मारले. त्यांनी संपूर्ण इनिंगमध्ये फक्त दोन सिक्स मारले. तर ऑस्ट्रेलियाने हवेत शॉट खेळण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांची टॉप ऑर्डर ढेपाळली अन् त्यांना रेनचेज जमला नाही.
advertisement
ऑस्ट्रेलियासाठी झिम्बॉब्वे 'डार्क हॉर्स'
दरम्यान, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध आत्तापर्यंत कधीच विजय मिळवता आला नाही. अशातच झिम्बॉब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 2007 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमने सामने आले. त्यानंतर आज देखील ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला नाही.
advertisement
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मार्कस स्टॉइनिस, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, मॅथ्यू कुहनेमन.
झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन - ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डीओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 2:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Australia vs Zimbabwe : टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बॉब्वेकडून तगड्या ऑस्ट्रेलियाचा पराभव!









