BCCI चा फॉर्म्युला तयार पण रोहित-विराट 'अनफिट', या एकाच अटीवर खेळू शकतात 2027 चा वनडे वर्ल्ड कप

Last Updated:

BCCI to Rohit Sharma and Virat Kohli : जर कोहली आणि रोहित दोघांनाही वनडे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहायचं असेल तर त्यांना या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल.

BCCI to Rohit Sharma and Virat Kohli
BCCI to Rohit Sharma and Virat Kohli
ODI 2027 Cricket World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि रोहित आणि विराट यांच्या स्वप्नांना छेद दिला. त्याचवेळी सर्वांना वाटलं आता दोघं काही वनडे सामने खेळणार नाहीत. पण रोहित आणि विराट यांनी निवृत्ती न घेता वनडेमध्ये आपली कामगिरी सुरूच ठेवली. आता दोघांचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे आगामी 2027 चा वनडे वर्ल्ड कप... बीसीसीआयने दोघांना डच्चू देण्याचा प्लॅनच तयार केलाय.

वनडे क्रिकेट खेळायचं असेल तर...

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, जर रोहित आणि कोहली यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही वनडे क्रिकेट खेळायचे असेल, तर त्यांना डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपापल्या राज्यांच्या संघाकडून खेळावे लागेल. याआधी रणजी ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीनंतर दोन्ही खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतली होती. यामुळेच, हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे.
advertisement

वर्ल्ड कपच्या रणनितीमध्ये अनफिट

टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी युवा खेळाडूंना तयार करण्याची योजना आखली आहे. एका सूत्राने दैनिक जागरणला सांगितलं की, "रोहित आणि कोहली हे आगामी वर्ल्ड कपच्या आमच्या रणनितीमध्ये बसत नाहीत." या दोन्ही खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 फॉरमॅटमधून आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
advertisement

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम?

दरम्यान, रोहित आणि विराट यांचं वय पाहता, या टप्प्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता खूपच कमी दिसते. भारताचा पुढील एकदिवसीय सामना ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असल्याने, या मालिकेत या प्रतिष्ठित जोडीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तर आता वनडे टीमचा कॅप्टन देखील बदलणार का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI चा फॉर्म्युला तयार पण रोहित-विराट 'अनफिट', या एकाच अटीवर खेळू शकतात 2027 चा वनडे वर्ल्ड कप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement