Asia Cup पुर्वी टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, स्पर्धा सूरू होण्यापूर्वीच खेळाडू बाहेर होणार?

Last Updated:

येत्या 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने सरावाला सूरूवात केली आहे.या सरावा दरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू लंगडता दिसला आहे.

Asia Cup 2025
Asia Cup 2025
Asia Cup 2025 : येत्या 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने सरावाला सूरूवात केली आहे.या सरावा दरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू लंगडता दिसला आहे.त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.आता हा खेळाडू स्पर्धेआधी फिट होतो की स्पर्धेतून बाहेर पडतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रेव्हस्पोर्ट्झच्या वृत्तानुसार,भारताने आज मैदानात कसून सराव केला होता.या सरावा दरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन मैदानात लंगडताना दिसला.संजू सॅमसनच्या पायाला प्रचंड वेदना होत होत्या.या वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होत्या.आता संजू समॅसन ही दुखापत कशी झाली? याची माहिती मिळू शकली नाही आहे.त्याचसोबत किती गंभीर आहे, याची देखील माहिती मिळाली नाही आहे. त्यामुळे आता आशिया कपमधील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
आशिया कपला 9 सप्टेंबरपासून सूरूवात होणार आहे.तर भारताचा पहिला सामना युएईविरूद्ध 10 सप्टेंबरला असणार आहे.
सॅमसन टी20 स्वरूपात भारताचा सलामीवीर होता जेव्हा संघ शेवटचा सर्वात लहान स्वरूपात खेळला होता. तो शीर्षस्थानी चांगली कामगिरी करत असताना, फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धची त्याची शेवटची टी20 मालिका नियोजित प्रमाणे झाली नाही. फलंदाजाने चार डावांमध्ये फक्त ३५ धावा केल्या.तसेच आयपीएल हंगामातही फारसा चांगला अनुभव आला नाही.राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून सॅमसन 14 पैकी फक्त नऊ सामन्यांमध्ये खेळला आणि संपूर्ण लगीमध्ये त्याला अनेक दुखापतींचा सामना करावा लागला.
advertisement
टीम इंडियात सध्या शुभमन गिल ही असल्याने अभिषेक शर्मा तो सलामीला उतरण्याची शक्यता आहे.तसेच सॅमसनच्या संघातील स्थानावर आधीच शंका उपस्थित केली जात होती.केरळच्या या सुपरस्टारसाठी आता दुखापत ही आणखी एक चिंतेची बाब असू शकते.त्यामुळे आता ही दुखापत बरी होते की तो स्पर्धेतून बाहेर पडतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup पुर्वी टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, स्पर्धा सूरू होण्यापूर्वीच खेळाडू बाहेर होणार?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement