तो कोच आपल्या खेळाडूंना पाजायचा सापाचं रक्त आणि कासवाचं सूप, खेळाडू गोल्ड मेडलच आणायचे!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
प्रशिक्षण दिलेल्या खेळाडूंना 'मा फॅमिली आर्मी' म्हणून ओळखलं जात असे. 'मा फॅमिली आर्मी'ने त्या वेळी अनेक ट्रॅक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले होते.
मुंबई: एक काळ असा होता जेव्हा अॅथलेटिक्स प्रशिक्षक 'मा जुनरेन' हे चीनमधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होतं. संपूर्ण जग त्यांना ओळखत होतं. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या खेळाडूंना 'मा फॅमिली आर्मी' म्हणून ओळखलं जात असे. 'मा फॅमिली आर्मी'ने त्या वेळी अनेक ट्रॅक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले होते. आपली क्षमता आणि वेगाने त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा जगताला चकित केलं होतं. या खेळाडूंनी प्रत्येक स्पर्धेत खळबळ उडवून दिली होती.
त्या काळी माध्यमांमध्ये अशा बातम्या छापल्या गेल्या होत्या, की मा जुनरेन आपल्या खेळाडूंना कठोर प्रशिक्षण देत होते आणि त्यासोबत काही सिक्रेट पदार्थही खायला देत होते. मा जुनरेनच्या सिक्रेट रेसिपीमध्ये सापाचं रक्त आणि कासवाच्या सूपचा समावेश होता, अशी बातमीही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली गोती. त्यात किती तथ्य होतं हे माहीत नाही; पण हे खरं आहे की तो आपल्या खेळाडूंना असं काहीतरी खाऊ घालत असे ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमालीची वाढत असे.
advertisement
मा जुनरेनने एका दुर्गम ग्रामीण माध्यमिक शाळेत ट्रॅक प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. नंतर त्याने खेळाडूंना तयार करण्यासाठी पद्धतशीर, कथित वैज्ञानिक प्रशिक्षणाचं धोरण स्वीकारलं. त्याच्या प्रशिक्षणात पारंपरिक चिनी औषधांचा समावेश होता. मा जुनरेन कठीण आणि क्रूर प्रशिक्षण पद्धतीसाठी, तसंच त्याच्या स्टार खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीसाठी ओळखला जात होता. तो त्या वेळी सर्वाधिक मागणी असलेला प्रशिक्षक बनला होता.
advertisement
चिनी खेळाडूंच्या खाण्याच्या विचित्र सवयी
आजही चिनी खेळाडूंच्या खाण्या-पिण्याच्या सवयी विचित्र मानल्या जातात. असं म्हटलं जातं, की ते खात असलेले पदार्थ कोणीही खाऊ शकत नाही. जगभरात असं म्हटलं जातं, की चिनी लोक कीटक, प्राणी, पक्षी आणि सापही खातात. अशा विचित्र आहारामुळे त्यांची ताकद आणि क्षमता प्रचंड वाढते. 2012मधल्या लंडन ऑलिम्पिकपूर्वी चिनी खेळाडूंचा चमू ड्रग्ज चाचणीबद्दल इतका घाबरला होता, की त्यांनी शाकाहारी अन्न खाण्यास सुरुवात केली.
advertisement
वांग जंक्सियालादेखील मा जुनरेनने दिलं होतं प्रशिक्षण
वांग जंक्सियाला मा जुनरेन यांनी किशोरवयातच प्रशिक्षण दिलं होतं. 1992मध्ये वांगने 10,000 मीटर अंतराची जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली होती. 1993मधल्या सर्वोत्तम वैयक्तिक हंगामात तिने ऑगस्ट महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 10,000 मीटरची शर्यत जिंकली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या चायनीज नॅशनल गेम्समध्ये तिने 10,000 मीटर अंतर 29 मिनिटं 31.78 सेकंदात पार करून 42 सेकंदांनी मागचं रेकॉर्ड मोडलं. ही शर्यत 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारी ती पहिली महिला धावपटू ठरली. याच स्पर्धेत तिने 3000 मीटर शर्यतीत 8 मिनिटं 6.11 सेकंदांचा विश्वविक्रम केला. वांगने 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तिथे तिने 5,000 मीटरमध्ये सुवर्णपदक आणि 10,000 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकलं. तोपर्यंत तिचे प्रशिक्षक मा जुनरेनसोबतचे संबंध बिघडले होते.
advertisement
जियांग बोलाही दिलं प्रशिक्षण
मा जुनरेनने प्रशिक्षक म्हणून चीनच्या 1997च्या राष्ट्रीय खेळांमध्ये सनसनाटी पुनरागमन केलं. तेव्हा त्याची शिष्या जियांग बो हिने महिलांच्या 5,000 मीटर शर्यतीत आठ सेकंदांपेक्षा जास्त फरकाने जागतिक विक्रम मोडला; मात्र जुनरेन पुन्हा वादात सापडला. 1998 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अधिकृत पात्रता स्पर्धांमध्ये भाग घेण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांनी जुनरेनच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघातून वगळलं. यानंतर प्रशिक्षक मा अचानक गायब झाला.
advertisement
पुनरागमन
बँकॉकमध्ये चीनचे खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तेव्हा देशातल्या प्रसारमाध्यमांनी जुनरेनला बोलावण्याची मागणी सुरू केली. त्यामुळे मा अचानक परत आला आणि जुन्या शैलीत काम करू लागला. क्रीडा अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध सुधारले. राष्ट्रीय ऑलिम्पिक चाचण्यांमध्ये मा याने सिद्ध केलं, की त्याने आपली शैली बदलली नाही. महिलांच्या 800 मीटर शर्यतीत त्याचा टीम सुवर्णपदक जिंकू शकली नाही तेव्हा तो संतापला; पण त्याच्या आर्मीने इतर लांब पल्ल्याच्या स्पर्धांमध्ये वर्चस्व राखलं. 1,500 मीटर, 5,000 मीटर आणि 10,000 मीटरमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलं. पॅरिस गोल्डन लीग स्पर्धेत माच्या टीमने दुसरं स्थान मिळवलं.
advertisement
खेळाडूंना टीममधून काढून टाकण्यात आलं
1,500 मीटर, 5,000 मीटर आणि 10,000 मीटरसाठी सात धावपटूंना मा जुनरेन सिडनीला घेऊन जाईल, असं अपेक्षित होतं. 5,000 मीटरमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी डोंग यानमेई हा खेळाडू सर्वांत प्रबळ दावेदार होता. पण, ब्लड टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने माच्या सहा खेळाडूंना सिडनी ऑलिम्पिकसाठी चीनच्या टीममधून वगळण्यात आलं. परिणामी, मा याला चिनी ऑलिम्पिक टीमच्या प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आलं. यानंतर, मा आणि त्याचे खेळाडू अनेक महिने गायब झाले. यामुळे मा याच्या प्रशिक्षण पद्धतींबद्दल शंका वाढल्या. कायदेशीर आणि वैयक्तिक वादांमुळे त्याची प्रतिष्ठादेखील कमी झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 25, 2024 10:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
तो कोच आपल्या खेळाडूंना पाजायचा सापाचं रक्त आणि कासवाचं सूप, खेळाडू गोल्ड मेडलच आणायचे!