advertisement

Team India Victory Parade: मरिन ड्राईव्हवर मुग्यांसारखी चाहत्यांची गर्दी अन् अ‍ॅम्बुलन्स आली आणि..

Last Updated:

Team India Victory Parade Updates: टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

टीम इंडियाचा रोड शो
टीम इंडियाचा रोड शो
मुंबई : T20 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाचा मोठा रोड शो सुरू आहे. नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी झाली आहे. माणसाचा समुद्र रस्त्यावर उतरल्याचा फील या गर्दीमुळे येत आहे. अशा गर्दीतीही भारतीय क्रिकेट फॅन्सच्या माणुसकीचं दर्शन घडलं आहे.
advertisement
मरीन ड्राईव्ह परिसरात एवढा जनसागर लोटला आहे की रोड शोसाठी जी बस वापरण्यात येणार आहे तीच बस गर्दीत अडकली आहे. याच बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे. मुंबईमध्ये पाऊस पडत असतानाही चाहते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई विमानतळावर आल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या विमानाला फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पाणी उडवून सलामी दिली आहे. तर दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरात या गर्दीत एक रुग्णवाहिका आली. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी या रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. जिथं माणसाला चालायला जागा नाही. तिथं या गर्दीने गाडीला वाट करुन दिल्याने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन संघाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मायदेशी परतल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. टीम इंडियाचा रोड शो झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भारतीय खेळाडूंना 125 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठीही वानखेडे स्टेडियम अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हाऊसफुल झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India Victory Parade: मरिन ड्राईव्हवर मुग्यांसारखी चाहत्यांची गर्दी अन् अ‍ॅम्बुलन्स आली आणि..
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement