Shikhar Dhawan Divorce : शिखर धवनचा पत्नी आयशासोबत घटस्फोट, मुलाचा ताबा कुणाकडे?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिखर धवनच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने शिखर धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून काही वर्षे दूर राहण्यासाठी भाग पाडत पत्नीने मानसिक त्रास दिला असं म्हटलं.
दिल्ली, 05 ऑक्टोबर : भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला दिल्लीतील पटियाला कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिलीय. शिखर धवनच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने शिखर धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून काही वर्षे दूर राहण्यासाठी भाग पाडत पत्नीने मानसिक त्रास दिला असं म्हटलं. न्यायालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी शिखर धवनने पत्नीवर लावलेले सर्व आरोप मान्य केले.
कौटुंबिक न्यायालयाने म्हटलं की, धवनच्या पत्नीने आरोपांना विरोध केला नाही आणि त्यावर बाजूही मांडता आली नाही. शिखर धवनने घटस्फोटाच्या याचिकेत म्हटलं होतं की, पत्नीने मानसिक छळ केला होता. दरम्यान न्यायालयाने मुलाच्या कायमस्वरुपी हक्काबाबत कोणतेही आदेश देण्यास नकार दिला आहे.
न्यायालयाने शिखर धवनला भारत आणि ऑस्ट्रेलियात काही काळासाठी मुलाला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्याचा अधिकार दिला आहे. न्यायालयाने धवनची पत्नी आयशाला आदेश देताना म्हटलं की, शाळेच्या सुट्ट्या असतील तेव्हा किमान कालावधीसाठी मुलाला शिखर धवन आणि त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी भारतात आणावे.
Location :
First Published :
October 05, 2023 7:22 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan Divorce : शिखर धवनचा पत्नी आयशासोबत घटस्फोट, मुलाचा ताबा कुणाकडे?