CSK IPL 2026 Schedule : चेन्नईचा संजू वैभव सूर्यवंशीशी भिडणार, ऋतुराज गायकवाडच्या टीमच्या मॅचच संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कधी आहे? आणि चेन्नई सुपर किंग्जचे कोणत्या टीमसोबत सामने पार पडणार आहे? आणि हे सामने कधी आणि कुठे असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
Chennai Super King IPL 2026 Match Schedule : आयपीएल 2026 च्या हंगामाच वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेजच हे वेळापत्रक असणार आहे. या वेळापत्रकानुसार चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कधी आहे? आणि चेन्नई सुपर किंग्जचे कोणत्या टीमसोबत सामने पार पडणार आहे? आणि हे सामने कधी आणि कुठे असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघ हा 30 मार्च पासून आपल्या आयपीएल मोहिमेला सूरूवात करणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज पहिला सामना हा 30 मार्च 2026 ला गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध असणार आहे.या सामन्यातून संजू सॅमसन आपल्या जुन्या सहकाऱ्यांविरूद्ध मैदानात उतरणार आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये राजस्थान संघात त्याची सलामीची जागा घेणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीशी देखील भिडताना दिसणार आहे.
advertisement
चेन्नई सुपर किंग्जचा 2025 चा हंगाम खूपच निराशाजनक राहिला होता. कारण संपूर्ण स्पर्धेत केवळ चार विजय मिळवून फ्रँचायझीच्या इतिहासात प्रथमच गुणतालिकेत तळाशी राहिला होता. त्यानंतर 2026 च्या लिलाव प्रक्रियेत मोठे फेरबदल झाल्यानंतर पाच वेळा विजेते संघ आगामी हंगामात पुनरागमनाची आशा बाळगतील.
चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2026 Chennai Super King Full Match Schedule)
| सामना क्रमांक | ठिकाण | संघ | तारीख | वेळ |
| 1 | गुवाहाटी | राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स | सोमवार, 30 मार्च | 7:30 PM |
| 2 | चेन्नई | चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स | शुक्रवार, 3 एप्रिल | 7:30 PM |
| 3 | चेन्नई | चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स | शनिवार, 11 एप्रिल | 7:30 PM |
| 4 | बेंगळुरू | RCB vs चेन्नई सुपर किंग्स | रविवार, 5 एप्रिल | 7:30 PM |
advertisement
दरम्यान सीएसकेने त्यांचे स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला घेतल आहे. गेल्या डिसेंबरमध्ये आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात सीएसकेने दोन अनकॅप्ड स्टार - कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर - यांना खरेदी करून इतिहास रचला. या दोन्ही तरुण खेळाडूंना प्रत्येकी 14.5कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, जे आयपीएल लिलावाच्या इतिहासातील अनकॅप्ड खेळाडूंसाठी सर्वाधिक बोली होती.
advertisement
चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, कार्तिक शर्मा, सरफराज खान, उर्विल पटेल, अंशुल कंबोज, खलील अहमद, नूर अहमद, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, मॅथ्यू विल्यम शॉर्ट, अमन खान,झॅक फोल्कस, मुकेश चौधरी, नाथन इलिस, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, अकेल होसेन, मॅट हेन्री, राहुल चहर.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 7:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK IPL 2026 Schedule : चेन्नईचा संजू वैभव सूर्यवंशीशी भिडणार, ऋतुराज गायकवाडच्या टीमच्या मॅचच संपूर्ण वेळापत्रक









