Digvesh Rathi : आयपीएल तर ट्रेलर, दिग्वेशने खरा धमाका आत्ता केला, T20 च्या इतिहासात पहिल्यांदाच...
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा एकदा धमाका केला आहे. लेग स्पिनर असलेल्या दिग्वेश राठीने 5 बॉलमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.
नवी दिल्ली : आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा एकदा धमाका केला आहे. लेग स्पिनर असलेल्या दिग्वेश राठीने 5 बॉलमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत. स्थानिक टी-20 लीगमध्ये दिग्वेशने हा विक्रम केला आहे. सोशल मीडियावर दिग्वेश राठीच्या या भेदक बॉलिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आयपीएल 2025 मध्ये दिग्वेश राठी लखनऊ सुपरजाएंट्सकडून खेळला. या मोसमात दिग्वेशची कामगिरी उल्लेखनीय झाली असली तरी सही करण्याच्या सेलिब्रेशनमुळे तो बराच अडचणीमध्ये आला. या सेलिब्रेशनमुळे दिग्वेशला सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये दंडही झाला, पण यानंतरही त्याने अशाच प्रकारे सेलिब्रेशन केल्यामुळे त्याला एका मॅचची बंदी घालण्यात आली. आयपीएलच्या या मोसमात दिग्वेश राठीने 13 सामन्यांमध्ये 30.64 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या. दिग्वेशच्या या कामगिरीनंतरही लखनऊला सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय होता आलं नाही.
advertisement
Digvesh Rathi. 5 stars 🌟 🌟🌟🌟🌟pic.twitter.com/tF4Nw0Gj0Q
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) June 16, 2025
दिग्वेशला योगराज सिंग यांचा पाठिंबा
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी राठीच्या वादग्रस्त नोटबुक सेलिब्रेशनचे समर्थन केले आहे. मॅचदरम्यान खेळाडूंच्या भावना बाहेर येतात, मॅच संपल्यानंतर खेळाडू एकमेकांचे मित्रच असतात, असं योगराज सिंग म्हणाले आहेत. तसंच मुलांवर दंडात्मक कारवाई करणे, हा मूर्खपणा असल्याची टीकाही योगराज सिंग यांनी केली आहे.
advertisement
दिग्वेशने गमावले पैसे
आयपीएलच्या या मोसमात दिग्वेश राठी याने 9,37,500 रुपये दंडाची रक्कम म्हणून दिले आहेत. लखनऊ सुपरजाएंट्सने आयपीएल लिलावात दिग्वेश राठीला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. 15 डिसेंबर 1999 साली जन्मलेला दिग्वेश राठी दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 29 नोव्हेंबर 2024 ला सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून राठीने पदार्पण केलं, यानंतर काही दिवसांमध्येच राठीला लखनऊने आयपीएल लिलावात विकत घेतलं. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात राठीने त्याच्या तिसऱ्याच बॉलला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
June 16, 2025 8:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Digvesh Rathi : आयपीएल तर ट्रेलर, दिग्वेशने खरा धमाका आत्ता केला, T20 च्या इतिहासात पहिल्यांदाच...