IPL 2026 : सगळ्यांना येड्यात काढून 100 कोटी कमावले, आता भांडं फुटताच म्हणाला 'टाटा गुड बाय'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Glenn Maxwell IPL Retirement : आयपीएल लिलावासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती. मात्र, मॅक्सवेलने लिलावासाठी आपलं नाव न दिल्याने अनेक चर्चा सुरू होती.
Glenn Maxwell IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधून अनेक खेळाडूंनी काढता पाय घेतल्याचं समोर आलं होतं. आंद्र रसल याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोईन अलीने पाकिस्तान प्रिमियर लीगमध्ये खेळणं पसंत केलंय. अशातच आता एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने देखील आयपीएलला टाटा गुड बाय केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील धडाकेबाज ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2026 पासून दूर राहण्याचा निर्णय घेऊन क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे.
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
येत्या 16 डिसेंबरला होणाऱ्या लिलावातून मॅक्सवेलने आपलं नाव मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या या अनपेक्षित निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आणि फ्रँचायझींचे आभार मानले आहेत.
माझे नाव न टाकण्याचा निर्णय
advertisement
आयपीएलमधील अनेक अविस्मरणीय हंगामांनंतर, मी यावर्षी लिलावात माझे नाव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे आणि या लीगने मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आयपीएलने मला एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून घडवण्यास मदत केली आहे, असं मॅक्सवेल म्हणाला.
तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद
advertisement
जागतिक दर्जाच्या संघसोबत खेळण्याचे, अविश्वसनीय फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि अतुलनीय आवड असलेल्या चाहत्यांसमोर कामगिरी करण्याचे भाग्य मला लाभले आहे. भारताच्या आठवणी, आव्हाने आणि ऊर्जा माझ्यासोबत कायम राहील. गेल्या काही वर्षांत तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, आशा आहे की लवकरच भेटू, असं ग्लेन मॅक्सवेल म्हणाला आहे.
आयत्या बिळावरचा नागोबा
दरम्यान, ऑस्ट्रेलियन आणि इंग्लीश खेळाडू आयपीएलमधून फक्त पैसे कमवण्यासाठी येतात, अशी नेहमी टीका केली जाते. वेगवेगळ्या सूत्रांनुसार मॅक्सवेलने आजवरच्या कमाईचा आकडा सुमारे 85.42 कोटी ते 100.64 कोटी रुपयांइतका आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मॅक्सवेलवर बोली लागेल, अशी शक्यता नव्हती. आयपीएलच्या आयत्या बिळावरचा नागोबा उठलाय, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियामधून उमटत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 2:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : सगळ्यांना येड्यात काढून 100 कोटी कमावले, आता भांडं फुटताच म्हणाला 'टाटा गुड बाय'


