IND vs SA : पहिल्या इनिंगमध्ये डक, दुसऱ्यातही झिरो... डेब्यूची वाट पाहणारा टीम इंडियाचा स्टार पुन्हा फेल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मागच्या चार ते पाच वर्षांपासून टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची वाट पाहणारा खेळाडू दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या अनऑफिशियल टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्यवर आऊट झाला आहे.
बंगळुरू : मागच्या चार ते पाच वर्षांपासून टीम इंडियामध्ये पदार्पण करण्याची वाट पाहणारा खेळाडू दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या अनऑफिशियल टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्यवर आऊट झाला आहे. अभिमन्यू इश्वरन 2013 पासून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. बंगालकडून खेळताना प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्याची टीम इंडियासाठी निवड झाली. बरीच वर्ष टीम इंडियासोबत असूनही त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अभिमन्यू इश्वरन इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियासोबत होता, पण वेस्ट इंडिडविरुद्धच्या सीरिजसाठी त्याची निवड झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधूनही अभिमन्यूला टीममधून वगळण्यात आलं, पण दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या सामन्यात त्याला संधी दिली गेली.
इश्वरन दोन्ही इनिंगमध्ये फेल
अभिमन्यू इश्वनरला न खेळवताच टीममधून बाहेर केल्यानंतर भारतीय निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला टीकेचा सामना करावा लागला, पण दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये अभिमन्यूची बॅट शांत राहिली. पहिल्या इनिंगमध्ये फास्ट बॉलर शेपो मोरेकीने त्याला एलबीडब्ल्यू केलं, तर दुसऱ्या इनिंगमध्ये ओकुहले केलेने अभिमन्यूला पुन्हा एलबीडब्ल्यूच केलं. दोन्ही इनिंगमध्ये त्याला खातंही उघडता आलं नाही.
advertisement
इंडिया ए कडून खेळताना अपयशी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यू ईश्वरनचा रेकॉर्ड चांगला आहे. पण, तो इंडिया ए कडून खेळताना त्याला यश येत नाहीये. गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी त्याला संधी मिळाली होती, पण दोन सामन्यांच्या चार इनिंगमध्ये त्याला 36 रन करता आल्या. इंग्लंड दौऱ्यापूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याने चार इनिंगमध्ये 11, 80, 8 आणि 68 रन केल्या. या सीरिजमधल्या खेळपट्ट्या बॅटिंगसाठी सोप्या होत्या, पण तरीही अभिमन्यू शतक ठोकू शकला नाही. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध त्याने 44 रन केल्या, पण पडिक्कल, ध्रुव जुरेल यांनी शतकं केली, तर नारायण जगदीसन आणि साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी केल्या.
advertisement
इंडिया ए मजबूत स्थितीमध्ये
ध्रुव जुरेलच्या शतकाच्या मदतीने दक्षिण आफ्रिका एविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या इनिंगमध्ये 255 रन केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिका ए ची इनिंग 221 रनवर संपुष्टात आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया एचा स्कोअर 78/3 एवढा आहे. केएल राहुल 26 रनवर खेळत आहे. इंडिया ए ची आघाडी 112 रनवर पोहोचली आहे.
view commentsLocation :
Bangalore [Bangalore],Bangalore,Karnataka
First Published :
November 07, 2025 9:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : पहिल्या इनिंगमध्ये डक, दुसऱ्यातही झिरो... डेब्यूची वाट पाहणारा टीम इंडियाचा स्टार पुन्हा फेल!


