advertisement

Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6,6,6... अभिषेक शर्माने इतिहास घडवला, T20 मधलं सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त!

Last Updated:

जगातला नंबर वन टी-20 बॅटर असलेल्या अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विश्वविक्रम केला आहे.

6,6,6,6,6,6,6,6... अभिषेक शर्माने इतिहास घडवला, T20 मधलं सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त!
6,6,6,6,6,6,6,6... अभिषेक शर्माने इतिहास घडवला, T20 मधलं सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त!
नागपूर : जगातला नंबर वन टी-20 बॅटर असलेल्या अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विश्वविक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा सगळ्यात जलद 5 हजार रन करणारा खेळाडू बनला आहे. 25 वर्षांच्या अभिषेकने न्यूझीलंडविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात फक्त 35 बॉलमध्ये 84 रन केले. या इनिंगमध्ये त्याने 5 फोर आणि 8 सिक्सही मारले. या इनिंगमध्ये अभिषेकने टी-20 फॉरमॅटमध्ये 5 हजार रन पूर्ण केले आहेत.
अभिषेक शर्माला टी-20 फॉरमॅटमध्ये 5 हजार रन पूर्ण करण्यासाठी 82 रनची गरज होती. हे रेकॉर्ड अभिषेकने फक्त 33 बॉलमध्येच पूर्ण केलं. अभिषेकच्या आधी टी-20 मध्ये सगळ्यात जलद 5 हजार रन पूर्ण करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या नावावर होता. रसेलने 2,942 बॉलमध्ये 5 हजार रन पूर्ण केल्या.

टी-20 फॉरमॅटमध्ये सगळ्यात जलद 5 हजार रन

advertisement
अभिषेक शर्मा (भारत) - 2898 बॉल
आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)- 2942 बॉल
टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)- 3127 बॉल
विल जॅक्स (इंग्लंड)- 3,196 बॉल
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)- 3,239 बॉल
अभिषेक शर्माचं शतक या सामन्यात हुकलं, पण त्याने 84 रनची खेळी करून भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत न्यायला मदत केली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये 5 हजार रन पूर्ण करणारा अभिषेक शर्मा 131 वा खेळाडू बनला आहे, पण या सगळ्या खेळाडूंमध्ये अभिषेकचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक म्हणजेच 172.54 एवढा आहे. अभिषेक शर्माने 165 टी-20 इनिंगमध्ये 5 हजार रनचा टप्पा पार केला आहे.
advertisement

सगळ्यात जलद 5 हजार रन करणारे भारतीय बॅटर (इनिंग)

केएल राहुल- 143 इनिंग
ऋतुराज गायकवाड- 145 इनिंग
शुभमन गिल- 154 इनिंग
अभिषेक शर्मा- 165 इनिंग
विराट कोहली- 167 इनिंग
अभिषेक शर्माने या सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. भारताने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 68 रन केले होते, ज्यात अभिषेकने 15 बॉलमध्ये 31 रनचं योगदान दिलं. इशान किशन आणि संजू सॅमसन या दोन्ही खेळाडूंना मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं, पण तरीही अभिषेकने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6,6,6... अभिषेक शर्माने इतिहास घडवला, T20 मधलं सगळ्यात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement