IND vs PAK : 41 वर्षानंतर दोन्ही शत्रू आशिया कपच्या फायनलमध्ये, इरफान पठाणने केलं पाकिस्तानचं कौतूक, म्हणाला...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan, Asia Cup Final : इतर संघांचं आणि टीम इंडियामधील अंतर स्पष्ट आहे, असं म्हणत इरफान पठाणने पाकिस्तानला जागा दाखवली आहे, तसेच, पाकिस्तान संघाच्या बॉलिंगचं त्याने कौतूक देखील केलंय.
Irfan Pathan praised Pakistan : आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. गुरुवारी, 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तब्बल 41 वर्षानंतर पाकिस्तान आणि भारत फायनलमध्ये आमने सामने येणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू इरफाण पठाण याने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्याने पाकिस्तानच्या बॉलिंगचं कौतूक देखील केलं.
पठाणने पाकिस्तानला जागा दाखवली
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. भारताने आपलं वर्चस्व दाखवलं आहे, इतर संघांचं आणि टीम इंडियामधील अंतर स्पष्ट आहे, असं म्हणत इरफान पठाणने पाकिस्तानला जागा दाखवली आहे, तसेच, पाकिस्तान संघाने विशेषतः गोलंदाजी विभागात सुधारणा दाखवली आहे, असं म्हणत इरफान पठाणने पाकिस्तानचं कौतूक देखील केलंय.
advertisement
पाकिस्तानने शिस्त दाखवली - इरफाण पठाण
बांगलादेश संघाच्या बॅटिंग परफॉर्मन्समध्ये हेतूचा अभाव होता. बांग्लादेश संघाने खूप जास्त डॉट बॉल, बांग्लादेशने खूप जास्त उडवे तिडवे फटके मारले. त्यामुळे त्यांना रनचेस करता आली नाही. याउलट, पाकिस्तान संघाने मैदानात शिस्त दाखवली, काही उत्कृष्ट कॅच देखील घेतले, असं देखील इरफाण पठाणने म्हटलं आहे.
advertisement
आशिया कपमध्ये 12 कॅच सोडले
दरम्यान, पाकिस्तान संघाने बांगलादेशविरुद्ध फिल्डिंग चांगली केल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानने एकही कॅच सोडला नाही. पण बांगलादेशने चार कॅच सोडले, याचा फटका बांगलादेशला बसला. हीच चूक टीम इंडियाने संपूर्ण आशिया कपमध्ये केली आहे. टीम इंडियाने यंदाच्या आशिया कपमध्ये 12 कॅच सोडले आहेत. त्यामुळे आता फायनलमध्ये टीम इंडियाला ही चूक सुधारण्याची गरज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 41 वर्षानंतर दोन्ही शत्रू आशिया कपच्या फायनलमध्ये, इरफान पठाणने केलं पाकिस्तानचं कौतूक, म्हणाला...