IND vs PAK : उथप्पाचा धमाका, स्टुअर्ट बिन्नीची ओव्हर टर्निंग पॉईंट, भारताचा पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय!

Last Updated:

क्रिकेटच्या मैदानात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय मिळवला आहे.

उथप्पाचा धमाका, स्टुअर्ट बिन्नीची ओव्हर टर्निंग पॉईंट, भारताचा पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय!
उथप्पाचा धमाका, स्टुअर्ट बिन्नीची ओव्हर टर्निंग पॉईंट, भारताचा पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. याचसोबत भारताने हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये विजयाने सुरूवात केली आहे. मोंग कॉक स्टेडियममध्ये शुक्रवारी पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय मिळवला आहे.

भारताने केले 86 रन

पाकिस्तानने या सामन्यात टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर ओपनर रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. उथप्पाने फक्त 11 बॉलमध्ये दोन फोर आणि तीन सिक्सच्या मदतीने 28 रन केले, तर चिपलीने 12 बॉलमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स मारून 24 रनची खेळी केली. कर्णधार दिनेश कार्तिक 17 रनवर नाबाद राहिला. भारताने निर्धारित 6 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 86 रन केले.
advertisement

डकवर्थ-लुईस नियमाने भारताचा विजय

विजयासाठी 87 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरूवात केली. 3 ओव्हरनंतर पाकिस्तानचा स्कोअर 1 विकेटवर 41 रन होता, तेव्हा पावसामुळे मॅच थांबवली गेली. पाऊस थांबत नसल्यामुळे डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे भारताला 2 रननी विजयी घोषित करण्यात आलं.

स्टुअर्ट बिन्नीच्या ओव्हरने मॅच फिरली

स्टुअर्ट बिन्नीने टाकलेली इनिंगमधली दुसरी ओव्हर मॅचचा टर्निंग पॉईंट ठरली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त 7 रन देऊन एक विकेट घेतली, ज्यामुळे मॅच भारताच्या बाजूने झुकली. याचसोबत दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने स्पर्धेला विजयी सुरूवात केली आहे. पाकिस्तानची टीम या स्पर्धेत अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळत आहे.
advertisement

हाँगकाँग सिक्सेस जुन्ही स्पर्धा

1990 च्या दशकात हाँगकाँग सिक्सेस ही स्पर्धा सुरू झाली, छोट्या फॉरमॅटमुळे ही स्पर्धा अल्पावधीतच लोकप्रिय झाली. 1993 ते 1997 दरम्यान स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर 2001 आणि 2012 मध्ये स्पर्धा पुन्हा खेळवली गेली. आता पुन्हा एकदा चाहत्यांना या स्पर्धेचा रोमांच पाहता येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : उथप्पाचा धमाका, स्टुअर्ट बिन्नीची ओव्हर टर्निंग पॉईंट, भारताचा पाकिस्तानवर 2 रननी थरारक विजय!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement