VIDEO : अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचे जंगी स्वागत; ढोल, पुष्पवृष्टी अन् गुजराती तरुणींचा डान्स
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पाकिस्तानी खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी तरुणी गुजराती वेशभुषेत आल्या होत्या. ढोलवादनही केले गेले. सोशल मीडियावर या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अहमदाबाद, 12 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानच्या संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या स्वागताचे व्हिडीओ आता व्हायरल होत असून बीसीसीआयला यामुळे ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांशिवाय अनेक नेत्यांनीही सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुलींचा डान्सही होता. याशिवाय खेळाडूंवर पुष्पवृष्टीही केली गेली. पाकिस्तानी खेळाडूंच्या या स्वागतावर भारतीय पाठिराख्यांनी सडकून टीका केलीय. काही युजर्सनी भारतीय लष्कराचे फोटो शेअर करत जवानांचे बलिदान विसरले का असा प्रश्न विचारला आहे.
#Ahmedabad welcomes Team Pakistan
Love Culture of India❤️#CWC23 #CWC2023 #INDvAFG #INDvsPAK #INDvPAK #ShubmanGill #RohitSharma #RohithSharma #ViratKohli #AUSvsSA #AUSvSA #Israel #Gaza #TrainAccident #TRAIN #trainderailed #Hamas #FreeGaza #Palestine #Bihar #BiharNews pic.twitter.com/7wsU5gs2Ba
— SportsPundit (@_SportsPundit) October 12, 2023
advertisement
पाकिस्तानी खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी तरुणी गुजराती वेशभुषेत आल्या होत्या. ढोलवादनही केले गेले. सोशल मीडियावर या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी पाकिस्तानचा संघ भारतात येताच पाहुणचाराने भारवल्याचे व्हिडीओ समोर आले होते.
पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला. त्यात त्यांनी ८१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱा सामना हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला. तो सामना पाकिस्तानने ६ गडी राखून जिंकला. भारताचाही हा तिसरा सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2023 2:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचे जंगी स्वागत; ढोल, पुष्पवृष्टी अन् गुजराती तरुणींचा डान्स