IND vs PAK : अंपायरसोबत राडा, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठी दुर्घटना; टीम इंडियाचे दोन खेळाडू जायबंदी!

Last Updated:

Yash Thakur Jitesh Sharma Collide : अंपायरने एमसीसीच्या नवीन नियमाचा उल्लेख करत माझला नॉट आऊट दिलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी अंपायरसोबत मोठा पंगा घेतला.

Yash Thakur Jitesh Sharma Collide
Yash Thakur Jitesh Sharma Collide
India A vs Pakistan A : रविवारी दोहा येथे झालेल्या सामन्यात रायझिंग एशिया कपमध्ये भारत अ संघाला पाकिस्तान शाहिन्सविरुद्ध 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. या विजयासह पाकिस्तानने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. पहिल्यांदा बॅटिग करणाऱ्या इंडिया ए संघाने 19 ओव्हरमध्ये 10 बाद 136 धावा केल्या. प्रत्युत्तरात, माज सदाकतच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तान ए संघाने फक्त 13.2 ओव्हरमधअये 137 धावा करत सामना जिंकला. मात्र, या सामन्यात मोठा ड्रामा पहायला मिळाला.

वादग्रस्त कॅच अन् मैदानात मोठा राडा

137 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी सलामीवीर माझला फलंदाजी करताना दोन वेळा जीवदान देण्यात आले. त्याचा एक कॅच सुटला, तर दुसरा कॅच वादग्रस्त ठरला, त्यामुळे मैदानात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. अंपायरने एमसीसीच्या नवीन नियमाचा उल्लेख करत माझला नॉट आऊट दिलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी अंपायरसोबत मोठा पंगा घेतला. त्यानंतर मैदानात मोठी दुर्घटना घडल्याचं दिसून आलं.
advertisement

...पण यशने कॅच सोडला नाही

पाकिस्तानचा फलंदाज यासिर खान हा 10 व्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर त्याने बॉल उंच मारला. त्यामुळे कॅचचा चान्स टीम इंडियाला मिळाला. त्यावर जितेश शर्मा आणि यश ठाकूर कॅच घेण्यासाठी धावले. दोघांनी एकमेकांना कॉल दिला नाही. त्यामुळे दोघांची धडक झाली. त्यावेळी दोघंही जमखी झाल्याचं दिसून आलं. पण एवढं सगळं झाल्यानंतरही यशने कॅच सोडला नाही. त्यामुळे पाकिस्तानला तिसरा धक्का बसला.
advertisement

पहिल्या चारमध्ये पोहोचण्याची संधी

दरम्यान, या विजयासह, पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे. पहिल्या सामन्यात ओमानवर 40 धावांनी विजय मिळवल्यानंतर संघाने ग्रुप बी पॉइंट टेबलमध्ये चार गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, भारत दोन सामन्यांनंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंडिया अ ने त्यांच्या पहिल्या सामन्यात युएईचा 148 धावांनी पराभव केला. भारताला अजूनही पहिल्या चारमध्ये पोहोचण्याची संधी आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : अंपायरसोबत राडा, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठी दुर्घटना; टीम इंडियाचे दोन खेळाडू जायबंदी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement