advertisement

VIDEO : अभिषेक बाद होताच गंभीरची सटकली, भयानक खुन्नस दिली, रिॲक्शन होतेय व्हायरल

Last Updated:

वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर 195 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा नेहमीप्रमाणे 10 धावांवर स्वस्तात बाद झाला होता.

gautam gambhir unhappy with abhishek sharma
gautam gambhir unhappy with abhishek sharma
India vs west Indies : टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेटने पराभव केला आहे. संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची मॅच विनिंग खेळीमुळे टीम इंडियाने सामना जिंकला होता. या विजयासह टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. दरम्यान संजू व्यतिरीक्त टीम इंडियाचा एकही खेळाडु मैदानात टीकू शकला नाही.त्यातल्या अभिषेक शर्मा तर मोक्याच्या क्षणी बाद झाला होता. तो बाद झाल्यानंतर गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.
खरं तर वेस्ट इंडिजने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला आज मैदानात दोन्ही सलामीविरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण अभिषेक शर्माने टीम इंडियाला दगा दिला होता. कारण तो अवघ्या 10 धावा करून बाद झाला होता. अभिषेकची ही बॅटींग पाहून डगआऊटमध्ये बसलेला गंभीर प्रचंड नाराज झाला होता. त्यामुळे त्याची रिअॅक्शन व्हायरल होते आहे.
advertisement
अभिषेक बाद झाल्यानंतर तो डगआऊटच्या दिशेने येत होता. त्यावेळी गंभीरवर कॅमेरा पडताच तो धीरगंभीरल होता आणि आतून प्रचंड चिडलेला होता पण कॅमेरा समोर येताच त्याने मान फिरवली. तर आपल्या खराब कामगिरीमुळे अभिषेक शर्मा मान टाकून निघून गेला होता.
advertisement
अभिषेक शर्मानंतर ईशान किशनही 10 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी केली होती. त्यानंतर संजूने एका बाजूने डाव सावरला असताना कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या हातून मोठी चूक झाली तो बाऊंड्री लाईनवर कॅच देऊन बसला होता.
कॅप्टन सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला होता,पण 27 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला होता. टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना संजू सॅमसनने एकाबाजूने भारताचा डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलं.या दरम्यान त्याने 50 बॉल 97 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.
advertisement
या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. टीम इंडियाता सेमी फायनलचा सामना हा इंग्लंड विरूद्ध असणार आहे. हा सामना 4 मार्चला रंगणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : अभिषेक बाद होताच गंभीरची सटकली, भयानक खुन्नस दिली, रिॲक्शन होतेय व्हायरल
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement