Mohammad Siraj : आपल्याच टीममधल्या खेळाडूवर भडकला मोहम्मद सिराज, राग पाहून गिल मध्ये पडला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये रविवारी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला, या सामन्यात गुजरातचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज हा त्याच्याच टीममधल्या सहकाऱ्यावर भडकला.
अहमदाबाद : आयपीएल 2025 मध्ये रविवारी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला, या सामन्यात गुजरातचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज हा त्याच्याच टीममधल्या सहकाऱ्यावर भडकला. गुजरातची बॉलिंग सुरू असताना सिराजच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगमध्ये चूक झाली, त्यामुळे चेन्नईला दोन रन जास्त मिळाल्या. फिल्डरच्या या निष्काळजीपणामुळे मोहम्मद सिराजला राग आला.
या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सिराज मॅचमधील पाचवी आणि त्याची तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आला, तेव्हा ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सीएसकेचा बॅटर उर्विल पटेलने बॉल मिड-ऑफकडे मारला आणि एक रन पूर्ण केली, पण बॅटर क्रीजमध्ये पोहोचल्यावरही गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने थ्रो केला आणि स्टम्प पाडले, त्यामुळे बॉल मिड विकेटच्या दिशेने गेला, पण तिकडे फिल्डर नसल्यामुळे चेन्नईला आणखी एक रन मिळाली.
advertisement
बॉल मिड-विकेटच्या दिशेने गेल्यानंतर गुजरातचा फिल्डर साई किशोर बॉल पकडण्यासाठी आला, पण त्यानेही फिल्डिंग करताना चूक केली आणि बॉल आणखी पुढे गेला, त्यामुळे चेन्नईने आणखी एक रन घेतली. यानंतर साई किशोरने नॉन स्ट्रायकर एण्डला सिराजच्या दिशेने थ्रो केला, तेव्हा सिराजने रागाने बॉल फेकून दिला आणि सिराज साई किशोरवर भडकला, अखेर सिराजचा राग शांत करायला कर्णधार गिलला यावं लागलं.
advertisement
— The Game Changer (@TheGame_26) May 25, 2025
शास्त्रींनी उडवली सिराजची खिल्ली
सामना सुरू असताना रिप्लेमध्ये साई किशोरची फिल्डिंग आणि सिराजची प्रतिक्रिया दाखवण्यात आली, तेव्हा कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी 'क्या मियाँ' असं म्हणत सिराजची खिल्ली उडवली.
गुजरातचा सगळ्यात मोठा पराभव
advertisement
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला आणि 5 विकेट गमावून 230 रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा 18.3 ओव्हरमध्ये 147 रनवर ऑलआउट झाला. गुजरातने हा सामना 83 रननी गमावला. आयपीएल इतिहासातील गुजरातचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. यासह, चेन्नईने हंगामाचा शेवट विजयाने केला. पण ते पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिले.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
May 25, 2025 10:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohammad Siraj : आपल्याच टीममधल्या खेळाडूवर भडकला मोहम्मद सिराज, राग पाहून गिल मध्ये पडला, Video