IPL मध्ये कुणी विचारेना... डुप्लेसिसनंतर आणखी एक दिग्गज खेळाडू पाकिस्तानात पळाला!

Last Updated:

आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा लिलाव 16 डिसेंबरला होणार आहे, पण लिलावाआधीच काही खेळाडूंना आपल्यावर बोली लागणार नाही हे कळून चुकलं आहे.

IPL मध्ये कुणी विचारेना... डुप्लेसिसनंतर आणखी एक दिग्गज खेळाडू पाकिस्तानात पळाला!
IPL मध्ये कुणी विचारेना... डुप्लेसिसनंतर आणखी एक दिग्गज खेळाडू पाकिस्तानात पळाला!
मुंबई : आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा लिलाव 16 डिसेंबरला होणार आहे, पण लिलावाआधीच काही खेळाडूंना आपल्यावर बोली लागणार नाही हे कळून चुकलं आहे. आयपीएलमध्ये बोली लागणं कठीण झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीग खेळण्याचा निर्णय आणखी एका खेळाडूने घेतला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डुप्लेसिसने आयपीएलऐवजी पीएसएलमध्ये खेळण्याची घोषणा केली होती. आता आयपीएल 2025 मध्ये केकेआरकडून खेळलेल्या मोईन अलीनेही पीएसएल खेळण्याचं जाहीर केलं आहे.
मोईन अली आयपीएल 2026 मध्ये खेळणार नाही हे स्पष्ट आहे. केकेआरने आगामी आयपीएल हंगामापूर्वी मोईन अलीला रिलीज केले, यामुळे तो फाफ डुप्लेसिस नंतर पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेणारा दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसिसनेही आयपीएल 2026 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.
मोईन अली 2018 पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सहभागी झाला आहे. या काळात त्याने आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. मोईन अली एकूण 73 आयपीएल सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 1167 रन केल्या आहेत आणि 41 विकेट घेतल्या आहेत. गेल्या आयपीएलमध्ये मोईन अली केकेआरसाठी फक्त सहा सामने खेळला होता.
advertisement

मोईन अलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

मोईन अली इंग्लंडच्या सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक आहे. मोईन अलीने इंग्लंडसाठी 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तिन्ही फॉरमॅटमध्ये मोईन अलीने बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
मोईन अलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने बॅटिंगमध्ये 3094 रन केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 15 अर्धशतके आणि 5 शतके केली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 204 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2,355 रन केल्या आहेत आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 मध्ये मोईन अलीने 1229 रन करून 51 विकेट्स घेतल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL मध्ये कुणी विचारेना... डुप्लेसिसनंतर आणखी एक दिग्गज खेळाडू पाकिस्तानात पळाला!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement