IPL Auction 2026 : बीसीसीआयने काढली लिलावाची हवा, कितीही बोली लावली, तरी प्लेअर कंगालच होणार!

Last Updated:

आयपीएल 2026 साठीचा मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन हा सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू ठरू शकतो.

बीसीसीआयने काढली लिलावाची हवा, कितीही बोली लावली, तरी प्लेअर कंगालच होणार!
बीसीसीआयने काढली लिलावाची हवा, कितीही बोली लावली, तरी प्लेअर कंगालच होणार!
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन हा सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू ठरू शकतो. केकेआर आणि सीएसके ग्रीनसाठी सर्वाधिक पैसे लावण्याची शक्यता आहे, कारण केकेआरकडे 64.3 कोटी तर सीएसके कडे 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. ग्रीन हा आयपीएल 2023 च्या लिलावातही महागडा खेळाडू ठरला होता, पण यंदाच्या लिलावामध्ये आयपीएलने खेळाडूवर मॅक्सिमम प्राईज कॅप ठेवली आहे.
मिचेल स्टार्क हा 20 कोटींची बोली लागलेला आयपीएल इतिहासातला पहिला खेळाडू होता, जेव्हा 2023 मध्ये केकेआरने त्याला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. याच्या काही मिनिटांमध्येच हैदराबादने पॅट कमिन्ससाठी 20.5 कोटी रुपयांची बोली लावली. 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये पंजाबने सॅम करनला 18.5 कोटी रुपये दिले.
आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॅमरून ग्रीनला 17.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते, पण एका वर्षामध्येच मुंबईने ग्रीनला आरसीबीला ट्रेड केलं. ग्रीनने 2023 आणि 2024 च्या हंगामात 153.70 च्या स्ट्राईक रेटने 707 रन केल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात ग्रीनने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे, पण टीमनी त्याच्यावर कितीही बोली लावली तरी त्याला 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळणार नाहीत.
advertisement
आयपीएलने मिनी ऑक्शनसाठी कमाल शुल्काचा नियम लावला आहे. अनेकवेळा परदेशी खेळाडू हे मेगा ऑक्शनमध्ये स्वत:चं नाव न नोंदवता थेट मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होतात. मेगा ऑक्शनपेक्षा मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंना जास्त पैसे मिळतात, त्यामुळे आयपीएलने मॅक्सिमम प्राईज कॅपचा नियम लावला आहे. म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या लिलावात ग्रीनवर 30 कोटी रुपयांची बोली लागली तरी त्याला फक्त 18 कोटी रुपये मिळणार आहेत, तर उरलेले 12 कोटी रुपये हे भारतीय खेळाडूंच्या कल्याणासाठी वापरले जातील, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. हा नियम फक्त परदेशी खेळाडूंसाठीच लावण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंना मात्र लिलावात लागलेल्या बोलीची रक्कम दिली जाईल.
advertisement
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात एकूण 77 जागा उपलब्ध आहेत, ज्यापैकी 31 परदेशी खेळाडूंसाठी आहेत. 5 डिसेंबरपर्यंत टीमनी विकत घ्यायची इच्छा असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर 16 कॅप्ड भारचीय खेळाडूंची यादी कमी केली जाईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : बीसीसीआयने काढली लिलावाची हवा, कितीही बोली लावली, तरी प्लेअर कंगालच होणार!
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement