advertisement

IPL 2026 : ज्युनियरवर खापर फोडलं, पण... धोनीचे दोन्ही 'धुरंदर'च फेल, CSK च्या पराभवाचे व्हिलन!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं समीकरण आताच कठीण होऊन बसलं आहे.

ज्युनियरवर खापर फोडलं, पण... धोनीचे दोन्ही 'धुरंदर'च फेल, CSK च्या पराभवाचे व्हिलन!
ज्युनियरवर खापर फोडलं, पण... धोनीचे दोन्ही 'धुरंदर'च फेल, CSK च्या पराभवाचे व्हिलन!
बंगळुरू : आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं समीकरण आताच कठीण होऊन बसलं आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्सने प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यावर प्रत्येकी 14.20-14.20 कोटी म्हणजेच 28 कोटी 40 लाख रुपये मोजले. लिलावामध्ये ज्युनियरना इतके पैसे द्यायच्या सीएसकेच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, पण सीएसकेच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरतंय ते त्यांचे सीनियर खेळाडू.
आयपीएल 2026 च्या सुरूवातीला चेन्नईने राजस्थान रॉयल्ससोबत डील करून संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांमध्ये टीममध्ये आणलं, पण पहिल्या 3 सामन्यांनंतर चेन्नईची ही रणनीती त्यांच्यावरच उलटल्याचं दिसत आहे. संजूला टीममध्ये आणताना सीएसकेने कर्णधार ऋतुराज गायकवाडला 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं.

सीएसकेचे ओपनर फेल

ऋतुराज आणि संजूची जोडी विरोधी टीमना घाम फोडेल, असं वाटत होतं. 36 कोटी रुपयांच्या या ओपनिंग जोडीबद्दल सीएसकेच्या चाहत्यांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या, पण दोघांची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक झाली आहे. 36 कोटींच्या यो दोन्ही खेळाडूंनी पहिल्या 3 सामन्यांमध्ये मिळून फक्त 63 रन केल्या आहेत.
advertisement
आरसीबीविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात सीएसकेला विजयासाठी 251 रनचं आव्हान होतं, या स्कोअरचा पाठलाग करताना सीएसकेला वादळी सुरूवातीची गरज होती, पण संजू आणि ऋतुराजची जोडी पुन्हा एकदा फेल गेली. कर्णधार ऋतुराज गायकवाड फक्त 7 रन करून आऊट झाला तर संजू 9 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन्ही ओपनर स्वस्तात आऊट झाल्यानंतर सीएसकेची बॅटिंग पॉवरप्लेमध्ये फ्लॉप ठरली, त्यामुळे पॉवरप्लेमध्येच सीएसके मॅचमधून बाहेर झाली.
advertisement

पहिल्या दोन सामन्यांमध्येही निराशा

सीएसकेने मोसमातला त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला, यातही ऋतुराज आणि संजू 6-6 रन करून आऊट झाले. तर पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संजूने 7 आणि ऋतुराजने 28 रन केले.
आयपीएल 2026 च्या पहिल्या 3 सामन्यांचे आकडे पाहिले तर 36 कोटी रुपयांची ही जोडी सीएसकेचा सगळ्यात मोठा विक पॉईंट असल्याचं समोर आलं आहे. चेन्नईच्या जर्सीमध्ये संजू टी-20 वर्ल्ड कपसारखाच धमाका करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती, पण अजून संजूला सूर गवसलेला नाही. तर ऋतुराज गायकवाडच्या बॅटिंगवर रिटेनशनची किंमत आणि कॅप्टन्सीचा दबाव दिसत आहे. सीएसकेची टॉप ऑर्डरच अपयशी ठरत असल्यामुळे अनुभव नसलेल्या मीडल ऑर्डरवर दबाव वाढत आहे, जे सीएसकेच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ज्युनियरवर खापर फोडलं, पण... धोनीचे दोन्ही 'धुरंदर'च फेल, CSK च्या पराभवाचे व्हिलन!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement