बटलरमुळे राजस्थानला घरघर, संजूला CSK मध्ये जायचंय मग घोडं घडलं कुठं? RR ला हवाय धोनीचा सर्वात लॉयल खेळाडू!

Last Updated:

IPL 2026 : आगामी आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राजस्थान आपल्या सर्वात मोठ्या खेळाडूचा लिलाव करण्यास तयार झाला आहे.

IPL 2026 Rajasthan Royal Demand ravindra Jadeja From CSK
IPL 2026 Rajasthan Royal Demand ravindra Jadeja From CSK
Sanju Samson In CSK : गेल्या तीन वर्षात चांगली टीम असून देखील राजस्थान रॉयल्सला मागील 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आला नाही. मागील वर्षी अचानक कॅप्टन्सीचे प्रयोग केले गेल्याने राजस्थानला प्लेऑफ देखील गाठता आलं नाही. मागील वर्षी राजस्थानमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या तयारीत आहे. राजस्थानने याची विंडो ट्रेड सुरू केला आहे.

बटलरला सोडण्याने संजू नाराज

क्रिकबझच्या वृत्तानुसार, सॅमसनने राजस्थान रॉयल्ससोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लिलावापूर्वी इंग्लंडच्या जॉस बटलरला सोडण्यात आल्यामुळे संजू नाराज होता. संजूला बटलर कोणत्याही परिस्थितीत हवा होता. मात्र, फ्रँचायझीने संजूचं मत डावलून बटलरला रिलीज केलं. त्यामुळे संजू नाराज झाल्याचं दिसून आलं होतं. संजून थेट कॅप्टन्सीवर पाणी सोडलं. त्यानंतर आता संजू चेन्नईमध्ये जाण्याच्या तयारीत होता. मात्र, बोलणी फिसकटली.
advertisement

राजस्थानला हवाय रविंद्र जडेजा

संजू सॅमसनसाठी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड किंवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाची मागणी केली होती. मात्र, चेन्नईने राजस्थानची ही मागणी फेटाळून लावली. चेन्नई सुपर किंग्ज कोणत्याही मोठ्या खेळाडूला सोडू इच्छित नाही. चेन्नईने राजस्थानला पैशांच्या बदल्यात सॅमसनला खरेदी करण्याची मागणी केलीये. त्यामुळे आता संजूचा चेन्नईमध्ये जाण्याचा रस्ता जवळजवळ बंद झालाय, असं चित्र दिसतंय. त्यानंतर आता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संजूसाठी उत्सुक असल्याची माहिती मिळतीये.
advertisement

अंतिम निर्णय फ्रँचायझीचा

संजू सॅमसनने रॉयल्स व्यवस्थापनाला त्याला सोडण्याची अधिकृत विनंतीही केलीये. मात्र, खेळाडूला कायम ठेवण्याचा, सोडण्याचा किंवा व्यापार करण्याचा अंतिम निर्णय फ्रँचायझीचा असतो. त्यामुळे आता राजस्थान कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुखापतीमुळे संजू सॅमसन गेल्या हंगामात आयपीएलमधील काही सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी रियान परागने संघाचे नेतृत्व स्वीकारले, तर वैभव सूर्यवंशीला सलामीची संधी मिळाली होती.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बटलरमुळे राजस्थानला घरघर, संजूला CSK मध्ये जायचंय मग घोडं घडलं कुठं? RR ला हवाय धोनीचा सर्वात लॉयल खेळाडू!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement