advertisement

IPL च्या तारखा तातडीने बदलल्या, T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच BCCI चा मोठा निर्णय!

Last Updated:

भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे.

IPL च्या तारखा तातडीने बदलल्या, T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच BCCI चा मोठा निर्णय!
IPL च्या तारखा तातडीने बदलल्या, T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच BCCI चा मोठा निर्णय!
मुंबई : भारतामध्ये सध्या टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे, पण आता बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होईल, असं वृत्त समोर आलं आहे. याआधी आयपीएल दोन दिवस आधी म्हणजेच 26 मार्चला सुरू होईल, असं बीसीसीआयने सांगितलं होतं. 15 डिसेंबरला आयपीएलने सर्व फ्रँचायझींना स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होईल, असं कळवलं होतं.

आयपीएल फायनल कधी होणार?

28 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 31 मे रोजी खेळवली जाईल, असे पुढे सांगण्यात आले. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल पुढच्या आठवड्यात वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक घेईल. आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्यामुळे वेळापत्रकाला विलंब झाला आहे.
advertisement
कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि चेन्नई (तामिळनाडू) हे अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांचे होम ग्राउंड आहे, तर आसामची राजधानी गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्स (आरआर) चे दुसरे होम ग्राउंड आहे.
2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून, जेव्हा जेव्हा देशात सार्वत्रिक निवडणुका किंवा राज्य विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, तेव्हा वेळापत्रक दोन भागात जाहीर केले गेले आहे. यावेळीही असेच होऊ शकते. पण, सध्या बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बीसीसीआयकडून आयपीएलची घोषणा व्हायची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL च्या तारखा तातडीने बदलल्या, T20 वर्ल्ड कप सुरू असतानाच BCCI चा मोठा निर्णय!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement