Satara: साडीचा पदर यंत्रात अडकला, काही कळायच्या मुलासमोर आई आत ओढली गेली, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
शेत अडचणीत आल्यामुळे ज्वारीचे कणीस वाहतुकीनं रस्त्याच्या कडेला आणून मळणी सुरू होती. त्यांच्यासोबत पती बबन अणि मुलगा संदीप हा सोबत होता.
विशाल पाटील, प्रतिनिधी
कराड : साताऱ्यातील कराडमधून एक धक्कायक घटना समोर आली आहे. मळणी यंत्रात साडी अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबासोबत शेतात ज्वारीची मळणी करतानाचा हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसाार, साताऱ्यातील कराड तालुक्यातील विंग इथं सुतारकी वस्तीत दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. छाया बबन खबाले (वय ६५ ) असं मृत महिलेचं नाव आहे. सध्या गावात ज्वारी काढण्याचं काम सुरू आहे. छाया खबाले या आपल्या कुटुंबीयांसह शेतात मळणी यंत्राच्या मदतीने ज्वारी काढण्याचं काम करत होत्या. शेत अडचणीत आल्यामुळे ज्वारीचे कणीस वाहतुकीनं रस्त्याच्या कडेला आणून मळणी सुरू होती. त्यांच्यासोबत पती बबन अणि मुलगा संदीप हा सोबत होता.
advertisement
साडीचा पदर मळणी यंत्रात अडकला
दुपारच्या सुमारास मळणी अर्ध्यावर आली होती. यंत्रामध्ये ज्वारी पोत्यात भरत असताना अचानक छाया खबाले यांच्या साडीचा पदर यंत्राात अडकला. यंत्राच्या मागील शाफ्टमध्ये नंतर पट्यात गुंडाळली गेली. त्यामुळे छाया खबाले यांच्या गळ्याला फास बसला. तिथे उपस्थितीत असलेले त्याचे पती आणि मुलगा धावून आले. त्यांनी मळी यंत्र बंद केलं आणि साडी खुरप्याने कापली. त्यानंतर छाया खबाले यांना तातडीने उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून छाया खबााले यांनी मृत घोषित केलं.
advertisement
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
छाया खबाले यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. छाया यांना मृत घोषित करताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. छाया खबाले यांचा मृतदेह कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सध्याकाळी मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. सांयकळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. छाया खबाले यांच्या पश्चात पती, दोन मुलं, सुना आणि नातवडं असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 10:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: साडीचा पदर यंत्रात अडकला, काही कळायच्या मुलासमोर आई आत ओढली गेली, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना









