advertisement

VIDEO : मी तुम्हाला आज एक ब्रेकिंग न्यूज देतो, CNN News18 च्या सोहळ्यात जय शहा यांचा मोठा खुलासा

Last Updated:

आयसीसीचे चेअरमन जय शहा यांनी क्रिकेट वर्तुळातला सर्वात मोठा खुलासा केला आहे. सीएनएन न्यूज 18च्या इंडियन ऑफ द ईयरच्या सोहळ्यात व्यासपिठावर बोलताना जय शहा यांनी हा खुलासा केला आहे.

jay shah
jay shah
Jay Shah on Pay Paarity : आयसीसीचे चेअरमन जय शहा यांनी क्रिकेट वर्तुळातला सर्वात मोठा खुलासा केला आहे. सीएनएन न्यूज 18च्या इंडियन ऑफ द ईयरच्या सोहळ्यात व्यासपिठावर बोलताना जय शहा यांनी हा खुलासा केला आहे. जय शहा यांनी सुरुवातीला व्यासपिठावर मी तुम्हाला आज एक ब्रेकींग न्यूज देतो असे सांगत पुरुष खेळाडूंप्रमाणे महिला खेळाडूंना समान वेतन का दिलं?या मागचा खुलासा जय शहा यांनी यावेळी केला आहे. या संदर्भात ते काय बोलले आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर आज सीएनएन न्यूज 18च्या इंडियन ऑफ द ईयरच्या सोहळ्याला आयसीसीचे चेअरमन जय शहा उपस्थित होते.यावेळी त्यांच्या सोबत वर्ल्ड विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर, माजी क्रिकेटपटू मिताली राज आणि झुल्लन गोस्वामी यासारखे काही क्रिकेटपटू देखील व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी जय शाह यांनी पुरुषांप्रमाणे महिला संघाला समान वेतन का दिलं? याच कारण सांगितलं.
advertisement
न्यूज चॅनेलला प्रत्येक वेळी ब्रेकींग न्यूज हवी असते.पण आज आपण मला इतक्या प्रेमाणे मला बोलावलं म्हणून मी तुम्हाला ब्रेकींग न्यूज देऊ इच्छितो असे जय शाह यांनी सांगितले. पुढे जय शहा म्हणाले, जेव्हा एखाद्या आईवडिलांना एक मुलगा एक मुलगी असते, तेव्हा सर्व आपल्या मुलाला विराट आणि रोहित सारखं बनवण्याचा प्रयत्न करतात, पण कुणालाचा आपल्या मुलींना हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना बनवायचे नाही आहे.म्हणून हे समान वेतन यासाठी केलं कारण सर्व आपल्या मुलींना हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना बनवू शकतील,असा खुलासा जय शाह यांनी केला.
advertisement
हरमनला निर्णयाची कल्पनाच नव्हती
जय शहा यांच्याआधी हरमनप्रीत कौर देखील एक गुपित सांगते. ती म्हणते जेव्हा समान वेतनाबाबत चर्चा सूरू होती. तेव्हा मला एक कॉल आला होता बीसीसीआय ऑफिसमध्ये एक मिटींग आहे.तेव्हा मला या निर्णयाबाबत काहीच कल्पना नव्हती. पण मी पोहोचायच्या आधीच सरांनी (जय शहा) घोषणा करून टाकली होती. त्यानंतर सरांनी (जय शहा) मला सांगितलं, 'तुला कळालं मी काय घोषणा केली?' मी त्यांना म्हटलं नाही, मी ऑफिसमध्ये आहे. तुमच्यासाठी मी समान वेतनाची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता अजून मेहनत करायची आहे, असे जय शहा यांनी तिला सांगितल्याचे हरमनप्रीत कौर सांगते.
advertisement
दरम्यान टीम इंडियाच्या महिला खेळाडू्ंनी नोव्हेंबर महिन्याच्या सूरूवातीला वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता.या विजयानंतर टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी जगभर चर्चा झाली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मी तुम्हाला आज एक ब्रेकिंग न्यूज देतो, CNN News18 च्या सोहळ्यात जय शहा यांचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement