Maharashtra Kesari : सिकंदर शेखची हार,'बाहुबली'कडून चितपट, महाराष्ट्र केसरीत धक्कादायक निकाल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत किताब गटातील अंतिम फेरीत सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेखला चितपट केलं आहे.
Maharashtra Kesari Final 2026, Sikandar Shaikh vs Mahendra Gaikwad : पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत किताब गटातील अंतिम फेरीत सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेखला चितपट केलं आहे. अंतिम फेरीत 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखला 3-0 ने पराभूत केलं आहे. महेंद्र गायकवाड आता या विजयानंतर गादी विभागातील विजेता ठरलेल्या हर्षवर्धन सदगीरसोबत फायनलध्ये कुस्ती करणार आहे.
सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती. यावेळी 'बाहुबली' महेंद्र सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण मिळवले होते. त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावप होता. दुसऱ्या फेरीत सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला.पण बाहुबली असलेल्या महेद्र गायकवाडने सिकंदरला दोन्ही फेऱ्यात एक गुण घेऊ दिला नाही. आणि शेवटी 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेख 3-0 असा पराभव केला होता. या विजयासह महेद्र गायकवाड फायनलला पोहोचला आहे. हा माती विभागाचा निकाल होता.
advertisement
दरम्यान गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम फेरी पाडली होती. या फेरीत दोन्ही मलांनी आक्रामक सुरूवात केली होती. पण हर्षवर्धन सद्गीरने आपल्या अनुभवाचा कस दाखवत अवघ्या 2 मिनिट 12 सेकंदात सोलापूरच्या जय पाटीलचा चितपट केलं होतं. खरं तर हर्षवर्धन सद्गीरने 10 गुणांची आघाडी घेतली होती, जर जय पाटीलचे शुन्य गुण होते. यावेळी कुस्तीमध्ये दोन पैलवानाच्या गुणांमधला फरक हा 10 झाला तर तांत्रिक विजय (टेक्निकल सुपेरेयारीटी) मानली जाते. त्यामुळे हर्षवर्धन सद्गीरला विजयी घोषित करण्यात आले होते.त्यामुळे हर्षवर्धन सद्गीर माती विभागातून फायनलला पोहोचला आहे.
advertisement
दरम्यान आता फायनलमध्ये सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर यांच्यात फायनलची लढत होणार आहे. या लढतीत बाजी मारणारा पैलवान हा चांदीची गदा उचलणार आणि फॉर्च्युनर गाडीच्या चाव्या आणि रोख रक्कम त्यांच्या हातात येणार आहे.
विजेत्यांना काय बक्षीस मिळणार
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 7:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : सिकंदर शेखची हार,'बाहुबली'कडून चितपट, महाराष्ट्र केसरीत धक्कादायक निकाल






