Mohsin Naqvi : आधी ट्रॉफी पळवली, आता तोंड लपवण्याची आली वेळ, आयसीसी बैठकीतून मोहसिन नक्वीने काढला पळ!

Last Updated:

मोहसिन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत बीसीसीआयला सामोरे जायचे नाही. आशिया कप दरम्यान नक्वीच्या कृतींमुळे बीसीसीआयचे अधिकारी आधीच नाराज आहेत.

News18
News18
Mohsin Naqvi : आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आता भारताला विजय मिळवूनही एक महिना आशिया कप ट्रॉफी न देण्याबद्दल चिंतेत आहेत. बीसीसीआयने याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी यांना या प्रकरणी अनेक वेळा इशारा दिला आहे. भारतीय मंडळ आता दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करेल, जिथे नक्वी यांना आयसीसीच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परिणामी, नक्वी आयसीसी बैठक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाकिस्तानमध्ये राहून बीसीसीआय आणि टीम इंडियाविरुद्ध सातत्याने वक्तव्ये करणाऱ्या नक्वी यांनी आता एक नवीन पळून जाण्याची योजना आखली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्वी देशांतर्गत राजकीय बाबींमध्ये व्यस्त असल्याने आयसीसी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अनुपस्थित राहिले आहेत. बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करेल हे स्पष्ट नाही, परंतु आयसीसीच्या बैठकीत हा एक प्रमुख मुद्दा बनेल हे निश्चित आहे.
advertisement
आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा बीसीसीआय उपस्थित करणार
चार दिवसांची ही बैठक मंगळवारपासून सुरू झाली. हे लक्षात घ्यावे की नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत बीसीसीआयला सामोरे जायचे नाही. आशिया कप दरम्यान नक्वीच्या कृतींमुळे बीसीसीआयचे अधिकारी आधीच नाराज आहेत. बीसीसीआयने वारंवार ट्रॉफी परत करण्याची विनंती करूनही, नक्वी यांनी ती भारताला परत केलेली नाही. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आणि त्यावेळेस भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच बिघडलेले असताना टीम इंडियाने ट्रॉफी नक्वी यांच्याकडून स्वीकारण्यास नकार दिला.
advertisement
बीसीसीआयची मागणी आणि नक्वीची योजना
बीसीसीआयने एसीसीला पत्र लिहून ट्रॉफी मुंबईला पाठवण्यास सांगितले आहे. पण नक्वी सहमत नाहीत. नक्वी म्हणतात की ते १० नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या समारंभात बीसीसीआयच्या प्रतिनिधीला आणि भारतीय संघाच्या खेळाडूला वैयक्तिकरित्या ट्रॉफी सोपवतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohsin Naqvi : आधी ट्रॉफी पळवली, आता तोंड लपवण्याची आली वेळ, आयसीसी बैठकीतून मोहसिन नक्वीने काढला पळ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement