ranji trophy 2024 : पृथ्वी शॉ आणि रहाणे असतानाही 'या' संघासमोर बलाढ्य मुंबईची दाणादाण, सामन्यात नेमकं काय घडलं?

Last Updated:

मुंबईने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी 101.4 ओव्हरमध्ये 10 विकेटवर मुंबईने पहिल्या डावात 351 धावा केल्या.

क्रिकेट सामना
क्रिकेट सामना
रामकुमार नायक, प्रतिनिधी
रायपुर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे रणजी स्पर्धेत छत्तीसगड आणि मुंबईमध्ये सामना सुरू आहे. मुंबईच्या संघाने पहिल्या डावात 351 धावा केल्या. यानंतर छत्तीसगढच्या संघाने पहिल्या डावात 350 धावा केल्या. मुंबईसारख्या भक्कम संघाचा सामना छत्तीसगडच्या संघाने केला. मुंबई संघाकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूंची फौज आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरसारखे फलंदाज आहेत. मात्र, छत्तीसगडच्या युवा गोलंदाजांनी त्यांचा सामना केला. यामध्ये पृथ्वी शॉशिवाय कोणीही मोठी खेळी करू शकले नाही.
advertisement
पहिल्या डावात 351 धावा -
मुंबईने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी 101.4 ओव्हरमध्ये 10 विकेटवर मुंबईने पहिल्या डावात 351 धावा केल्या. यामध्ये पृथ्वी शॉने 159, भूपेन लालवानीने 102 धावा केल्या. तर दुसरीकडे छत्तीसगडने गोलंदाजी करताना आशीष चौहानने 27 ओव्हरमध्ये 105 धावा देऊन 6 गडी बाद केले. तर रवि किरन याने 16.4 ओव्हर मध्ये 53 धावा देऊन 3 गडी बाद केले. याशिवाय विश्वास मलिकने एक विकेट घेतली होती.
advertisement
यामध्ये शशांक चंद्राकरने 56, संजीत देसाईने 41 आणि कर्णधार अमनदीप खरे अजून नाबाद 35 धावा करुन खेळत आहे. गोलंदाजी करताना मुंबईकडून तुषार पांडे, रॉस्टर डायस, शम्स मुलानी आणि तनुशने 1-1 गडी बाद केले. दुसरा दिवस संपला तेव्हा मुंबई 171 धावांनी पुढे आहे. 9 फेब्रुवारीला सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 विकेटवर 310 धावा करणारा मुंबईचा संघ दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारीला फक्त 41 धावा करू शकली.
advertisement
41 धावात 6 गडी बाद -
मुंबईचे 6 गडी फक्त 41 धावात बाद झाले. यामध्ये पहिल्या दिवशी आशिषने 3 गडी बाद केले होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याने 3 गडी बात केले. याआधी पदार्परण करत केरळ विरोधात त्याने 5 गडी बाद केले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ranji trophy 2024 : पृथ्वी शॉ आणि रहाणे असतानाही 'या' संघासमोर बलाढ्य मुंबईची दाणादाण, सामन्यात नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement