VIDEO : क्रिकेटच्या मैदानात कुस्ती, लाथा बुक्यांनी झाली मारहाण, LIVE सामन्यात काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
क्रिकेट म्हटलं तर मैदानात राडे आलेच, एकमेकांना डोळे दाखवणे, जबरदस्ती हुलकावणी देणे, अंगावर धावून जाणे किंवा शाब्दीक वाद होतच असतात.
Pakistan vs Australia : क्रिकेट म्हटलं तर मैदानात राडे आलेच, एकमेकांना डोळे दाखवणे, जबरदस्ती हुलकावणी देणे, अंगावर धावून जाणे किंवा शाब्दीक वाद होतच असतात. अशा सगळ्या घटना सूरू असताना क्रिकेटच्या मैदानात अक्षरस कुस्ती सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटनाही समोर आली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर येत्या 8 दिवसात टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप पूर्वी अनेक संघ टी20 मालिका खेळतायत. जसे भारत न्यूझीलंड विरूद्ध टी20 मालिका खेळते आहे.त्याचप्रमाणे पाकिस्तान देखील ऑस्ट्रेलियासोबत टी20 मालिका खेळतो आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्या दरम्यान मोठा राडा झाला आहे.
🚨 GEMS OF PAKISTAN 🚨
- When Babar Azam got out on 24(20), a random guy in Lahore Stadium said, 'Ghante ka King' 😆
- Hearing this, Babar Azam's fans got angry and started beating the random guy 😯
- What's your take 🤔pic.twitter.com/p177f3Vg24
— Richard Kettleborough (@RichKettle07) January 30, 2026
advertisement
त्याचं झालं असं ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्याच टी20 सामन्यात पाकिस्तानचा बाबर आझम अवघ्या 20 बॉलमध्ये 24 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर स्टेडिअममध्ये बसलेल्या एका चाहत्याने बाबर आझम बाबत अपशब्द वापरले होते.'&%#@ का किंग...' असे म्हणत एकाने बाबर आझमवर टीका केली होती. ही टीका बाबर आझमच्या चाहत्यांना मान्य झाली नाही आणि काही चाहत्यांनी मिळून एकाला बेदल लाथा बुक्क्यांनी चोपलं. या दरम्यान अनेकांनी सिक्युरीटीला बोलावण्याचा प्रयत्न केला. पण सिक्युरीटी काय आली नाही आणि त्या तरूणाईची बेदम धुलाई झाली होती.याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झालं पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया फक्त 148 धावाच करू शकली होती.त्यामुळे पाकिस्तानने 22 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरन ग्रीनने 36 तर झेवियर ब्राटलेटने 34 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानकडून अबरार अहमद आणि सायम अयुबने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत. तर शादाब खान आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.पाकिस्तानकडून सायम अयुबने 40 आणि कर्णधार सलमान आघाने 39 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर पाकिस्ताने 168 धावा केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 8:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : क्रिकेटच्या मैदानात कुस्ती, लाथा बुक्यांनी झाली मारहाण, LIVE सामन्यात काय घडलं?








