कॉपी करायची नाही! आशिया कपच्या तोंडावर पाकिस्तानचा मोठा निर्णय

Last Updated:

येत्या 9 सप्टेंबरपासुन आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेनंतर देशात वुमेन्स वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. 30 सप्टेंबरला या वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.

icc womens world cup
icc womens world cup
Womens World Cup 2025 :  येत्या 9 सप्टेंबरपासुन आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेनंतर देशात वुमेन्स वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. 30 सप्टेंबरला या वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.त्याआधी महिला विश्वचषकाचा उद्घाटन समारंभ 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या उद्धाटन सोहळ्याला सर्वंच देशाचे कर्णधार उपस्थित राहणार आहेत. पण पाकिस्तान संघ उद्धाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या निर्णयाची कॉपी केल्याची माहिती आहे.कारण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता.
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे.ही स्पर्धा 30 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 2 नोव्हेंबरला विजेता ठरणार आहे.वुमेन्स वर्ल्ड कप चा उद्घाटन समारंभ 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
सर्व संघ उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होते. त्यानंतर पत्रकार परिषद आणि ट्रॉफीसह फोटोशूट होणार होते.परंतु आता पाकिस्तानी संघ उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.जिओ सुपरच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ उद्घाटन समारंभासाठी भारतात जाणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चा कोणताही प्रतिनिधी देखील या समारंभाला उपस्थित राहणार नाही.
advertisement
भारताने पुरूष संघाने अशाच प्रकारचा निर्णय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धे दरम्यान घेतला होता. पाकिस्तानमध्ये पार पडणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्धाटनला जाण्यास भारताने नकार दिला होता.तसेच भारताने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले.आता अशाच प्रकारे वुमेन्स वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानने निर्णय घेतला आहे.तसेच पाकिस्तान आपले सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहे.
जरी पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचला तरी त्यांचे सामने कोलंबोमध्ये होतील. पाकिस्तानी संघ 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. तर भारताविरुद्धचा त्यांचा सामना 5 ऑक्टोबर रोजी होईल. पाकिस्तानी संघ फातिमा सना यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक सामने खेळेल. संघाची उपकर्णधार मुनिबा अली असेल. तर आलिया रियाझ, डायना बेग, नाशरा संधू यासारख्या अनुभवी खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
advertisement
पाकिस्तानी संघ: फातिमा सना (कर्णधार), मुनिबा अली (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, इमान फातिमा, नाशरा संधू, नतालिया परवेझ, ओमैमा सोहेल, रमीन शमीम, सदाफ शमास, सादिया इक्बाल, शवाल झुल्फिकार, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, सय्यदा अरुब शाह.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कॉपी करायची नाही! आशिया कपच्या तोंडावर पाकिस्तानचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement