VIDEO : बाप्पाला निरोप देताना जिनिलिया वहिनी झाली इमोशनल, विसर्जनाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ganesh Visarjan 2025 : रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी गणेशोत्सवाचा भावूक निरोप व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी मुलांसह 'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष केला.
मुंबई : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव सणाचा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात समारोप झाला. आज ठिकठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखही याला अपवाद नाहीत. त्यांच्या घरच्या बाप्पाच्या निरोपाचा एक भावूक व्हिडिओ जिनिलीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे.
देशमुखांच्या घरी प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याची अपडेट जिनिलीया नेहमीच तिच्या चाहत्यांना देत असते. यंदाही तिने गणपती बाप्पाच्या निरोपाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.
रितेश देशमुखने मुलांसह गणपती बाप्पाला दिला निरोप
या व्हिडिओमध्ये रितेश बाप्पाची मूर्ती हातात घेऊन उभा आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन्ही मुलगे, रियान आणि राहिल दिसत आहेत. वडील-मुलांची ही जोडी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करत आहे. मुलंही रितेशच्या मागे मोठ्या उत्साहात घोषणा देताना दिसत आहेत.
advertisement
जिनिलीयाने हा व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शन लिहिलं आहे, “निरोप हा नेहमीच दुःखद असतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”

रितेश आणि जिनिलीया ही बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीतीलही एक लोकप्रिय जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आवडते. आपल्या मुलांवर संस्कार करत आणि मराठमोळी संस्कृती जपल्याबद्दल त्यांचे चाहते नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 9:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : बाप्पाला निरोप देताना जिनिलिया वहिनी झाली इमोशनल, विसर्जनाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...