ज्याच्या फोनमुळे अजितदादांनी महिला अधिकाऱ्याला झापलं, त्या बाबा जगतापचा खळबळजनक व्हिडीओ समोर

Last Updated:

अजितदादांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता या कार्यकर्त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
पुणे : अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना थेट फोनवरून कारवाई थांबवण्याचा आदेश देण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी सडकून टीका करत पवारांना घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अजित पवार आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचे संभाषण घडवून आणणारा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता या कार्यकर्त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, अंजली कृष्णा या अधिकाऱ्यांनी उत्खनन रोखण्यासाठी कारवाई सुरू केली असताना त्यांना फोन कॉलवरून अजित पवार यांनी कारवाई थांबण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप पवारांवर झाला आहे. दरम्यान, प्रकरण तापल्यावर अजित पवार यांनी आपली बाजू मांडली. 'माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता,' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
advertisement

बाबा जगतापचा नवा व्हिडीओ समोर 

या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा यांनी उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालून पवारांशी थेट संपर्क साधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये भर म्हणजे, बाबा जगताप याचा धुम्रपान करणारा नवा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
advertisement
मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता
अवैध उत्खननासंदर्भात वारंवार राजकीय दबाव येत असल्याच्या चर्चा याआधीही होत होत्या. मात्र, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेले संभाषण आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा व्हिडीओ हे दोन्ही प्रकार एकत्र आल्याने या प्रकरणावरून मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्याच्या फोनमुळे अजितदादांनी महिला अधिकाऱ्याला झापलं, त्या बाबा जगतापचा खळबळजनक व्हिडीओ समोर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement