Vaibhav Suryavanshi : मर्यादा ओलांडत होता पाकिस्तानी फॅन, वैभव सूर्यवंशीने बोलती बंद केली, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 रननी पराभव केला.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 रननी पराभव केला. या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशी आणि पाकिस्तानी फास्ट बॉलर अली रझा यांच्यात मैदानातच मोठा वाद झाला. वैभवला आऊट केल्यानंतर अली रझा आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता, तसंच त्याने वैभवकडे पाहून अपशब्द वापरले. त्यानंतर वैभवनेही त्याला प्रत्युत्तर दिलं. बुटाकडे इशारा करुन वैभव अली रझाला काहीतरी म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाकिस्तानी चाहते वैभव सूर्यवंशीला चिडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी चाहते वैभव सूर्यवंशीला चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, 14 वर्षीय वैभवने ही परिस्थिती अतिशय हुशारीने हाताळली. तो चाहत्यांना दुर्लक्ष करून निघून गेला. वैभवने त्यांच्या चिडवण्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही.
advertisement
Pakistan’s fans are acting shamelessly and they have no sense of shame whatsoever.
These people are booing 14-year-old Vaibhav Suryavanshi just because Pakistan won a ‘cheap’ U19 Asia Cup. They’re acting like Pakistan won the World Cup.
This is why Pakistani people have no… pic.twitter.com/D1X6lgshr0
— Mention Cricket (@MentionCricket) December 22, 2025
advertisement
फायनलमध्ये भारताचा पराभव
भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 347 रन केल्या. पाकिस्तानचा ओपनर समीर मिन्हासने 113 बॉलमध्ये 172 रन केल्या, ज्यामुळे पाकिस्तानला एवढी मोठी धावसंख्या गाठता आली.
348 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीम 26.2 ओव्हरमध्ये 156 रनवर ऑलआऊट झाली. त्यामुळे फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा 191 रननी पराभव केला. भारताकडून दीपेश दीवेंद्रनने सर्वाधिक 36 रन केल्या. तर वैभव सूर्यवंशी 26 रन काढून आऊट झाला. अली रझा याने पाकिस्तानकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : मर्यादा ओलांडत होता पाकिस्तानी फॅन, वैभव सूर्यवंशीने बोलती बंद केली, Video










