Maruti ची 34 किमी मायलेज किंग Car, पहिल्यांदाच पाठवली सेफ्टी टेस्टला, आश्चर्यकारक रिपोर्ट

Last Updated:

मारुती सुझुकीच्या अनेक कार या मायलेजसाठी ओळखल्या जातात. त्यापैकी एक आहे Maruti Suzuki Celerio. पण, सेफ्टीच्या टेस्टमध्ये

News18
News18
काही दिवसांपूर्वी भारतात कार खरेदी करता किती मायलेज देते याचा विचार पहिला केला जात होता. पण, आता काळ बदलला आणि कार खरेदी करताना कार किती सेफ आहे, किती रेटिंग आहे, याची विचारणा केली जात आहे. कारण, रस्ते अपघाताचं वाढतं प्रमाण आणि कुटुंबाच्या सुरक्षेला आता लोक प्रथम प्राधान्य देत आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या अनेक कार या मायलेजसाठी ओळखल्या जातात. त्यापैकी एक आहे Maruti Suzuki Celerio. पण, सेफ्टीच्या टेस्टमध्ये Maruti Suzuki Celerio ला फक्त 3 स्टार रेटिंग मिळाले आहे.
अलीकडेच Maruti Suzuki Celerio ची  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट पार पडली. या टेस्टमध्ये Maruti Suzuki Celerio ला पुरुष प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 3-स्टार आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 2-स्टार रेटिंग मिळाले आहे.  प्रौढ सुरक्षेसाठी 34 पैकी 18.04 गुण आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 18.57 गुण मिळाले आहे. आधीच्या Maruti Suzuki Celerio पेक्षा ही कामगिरी चांगली असली तरी रेटिंग मात्र कमी आहे.
advertisement
Maruti Suzuki Celerio ची अशी झाली टेस्ट 
Maruti Suzuki Celerio ला मोठ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 34 पैकी 18.04 गुण मिळाले असून 3-स्टार रेटिंग आहे. फ्रंटल क्रॅश टेस्टमध्ये ड्रायव्हरसाठी डोक्याची सुरक्षा पुरेशी आणि प्रवाशासाठी चांगली मानली गेली, तर मान दोघांसाठी चांगली होती. छातीची सुरक्षा कमी होती, ड्रायव्हरसाठी कमकुवत आणि प्रवाशासाठी पुरेशी सेफ आहे.  गुडघ्यांची सुरक्षा साधारण मानली गेली, कारण डॅशबोर्डला धडकण्याची शक्यता होती. बॉडीशेल आणि फुटवेल दोन्ही अनबॅलन्स होते, जे जास्त दबाव सहन करू शकत नाही.
advertisement
लहान मुलांची सुरक्षा
Maruti Suzuki Celerio ची जेव्हा लहान मुलांची टेस्ट घेतली त्यामध्ये 49 पैकी 18.57 गुण मिळाले  आणि 2-स्टार रेटिंग आहे. फ्रंटल क्रॅश टेस्टमध्ये ३ वर्षांच्या डमीसाठी पुढे तोंड असलेल्या सीटमध्ये डोक्याचा एक्सपोजर दिसला, ज्यात मान आणि छातीची सुरक्षा कमकुवत होती. तसंच, 18 महिन्यांच्या डमीसाठी मागे तोंड असलेल्या सीटमध्येही लहान मुलाच्या डोक्याचा एक्सपोजर होता आणि छातीची सुरक्षा कमकुवत निघाली, Maruti Suzuki Celerio  मध्ये लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल मोठी कमतरता दिसून आली.
advertisement
Maruti Suzuki Celerio मध्ये ६ एअरबॅग्स
भारत सरकारच्या नव्या वाहन धोरणामुळे Maruti Suzuki Celerio मध्ये आता ६ एअरबॅग्स दिल्या जात आहे.  ग्लोबल एनकॅपने मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्समध्ये सहा एअरबॅग स्टँडर्ड  करण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे, मारुतीचे नवीन मॉडेल्स जसे डिझायर आणि विक्टोरिसला मजबूत पाच-स्टार रेटिंग मिळाले आहे.
Maruti Suzuki Celerio मायलेजमध्ये किंग
Maruti Suzuki Celerio ही मध्यमवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरट अशी कार आहे. alto k10 नंतर Maruti Suzuki Celerio चा नंबर लागतो. ही कार पेट्रोल आणि CNG व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार 25 किमी मायलेज देते तर CNG व्हेरियंटमध्ये 34 किमी इतकं मायलेज देते.
advertisement
Maruti Suzuki Ciaz ला 1 स्टार रेटिंग
Maruti Suzuki Ciaz ची जेव्हा क्रॅश घेण्यात आली तेव्हा 34 पैकी फक्त 20.86 गूण मिळाले. समोरील टेस्टमध्ये ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या सुरक्षेत कार फेल निघाली आहे. बॉडीशेल आणि फुटवेल भागात कार ही अस्थिर आढळली. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा अपघात झाला तर कारची फ्रेमही कमकवूत निघाली आहे. त्यामुळे कारला १ स्टार रेटिंग मिळाला.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti ची 34 किमी मायलेज किंग Car, पहिल्यांदाच पाठवली सेफ्टी टेस्टला, आश्चर्यकारक रिपोर्ट
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement