Prithvi Shaw : मला कुणाचाच फोन आला नाही फक्त... पृथ्वीला कठीण काळात कुणी मदत केली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
2 वर्षाच्या कठीण काळात पृथ्वी शॉला कुणाची मदत लाभली? कोणत्या क्रिकेटरने त्याला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला का? या गोष्टींचा खुलासा आता पृथ्वी शॉने केला आहे.
Prithvi Shaw News : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ कठीण काळातून जात आहे.त्याला अनेक मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत नाही आहे. गेल्या 2 वर्षापासून तो मैदानात वापसीचे प्रयत्न करत आहे.मात्र अद्याप त्यांच्या प्रयत्नात यश आले नाही आहे. पण या 2 वर्षाच्या कठीण काळात पृथ्वी शॉला कुणाची मदत लाभली? कोणत्या क्रिकेटरने त्याला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला का? या गोष्टींचा खुलासा आता पृथ्वी शॉने केला आहे.
पृथ्वी शॉने न्यूज 24च्या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पृथ्वी शॉने त्यांच्या आयुष्यातील आलेल्या चढ उतारांवर भाष्य केले आहे. पृथ्वी शॉला टीम इंडियातून वगळल्यानंतर त्याला मुंबईने रणजी ट्रॉफीतून वगळले आहे.त्याला आयपीएलमध्ये कुणीच खरेदीदार मिळालं नाही. त्यामुळे पृथ्वी शॉच करिअर धोक्यात आलं होतं.या काळात पृथ्वीला कुणी आधार दिला.
एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंसोबत तु क्रिकेट खेळलास.त्यामुळे ज्यावेळेस तुझ्या आयुष्यात कठीण काळ आला होता? या काळात तुला कुणाला फोन आला होता? कुणी तुला समजावण्याचा प्रयत्न केला होता का? असा सवाल पृथ्वी शॉला विचारण्यात आला होता.यावर पृथ्वी शॉ सांगतो, तुम्ही ज्या खेळाडूंचे नाव घेतले त्यामधला कुणीच नाही,असे पृथ्वी शॉने स्पष्ट सांगितलं.
advertisement
पृथ्वी शॉ पुढे सांगतो, रिषभ पंतचा मला फोन येत असतो.त्याला जेव्हा अधून मधून वाटते त्यावेळेस तो फोन करतो.सचिन तेंडुलकर सरांचा देखील येतो. कारण त्यांना माझा क्रिकेटमधला प्रवास माहित आहे. अर्जुन आणि मी एकत्र खेळता खेळता मोठे झाले आहोत. त्यावेळेस ते देखील सोबत असायचे.तसेच आता दोन महिन्यापंर्वी मास्टर लीगमध्ये देखील त्यांच्याशी बोलणे झाले होते.
advertisement
सचिन सर त्यावेळी म्हणाले, खूप जर गोष्टी चुकल्या तर आत्मविश्वासाची आवश्यकता असते. तुम्हाला माहिती आहे, किंवा संतुलन कुठेतरी थोडेसे गेले आहे. जर त्याला पुन्हा रुळावर आणायचे असेल, तर त्याला एका मार्गदर्शकाची किंवा अशा व्यक्तीची आवश्यकता आहे जो त्या मित्राच्या आतून एक ठिणगी निर्माण करू शकेल, तुम्ही बरोबर आहात. त्यांना अजूनही माझ्यावर विश्वास आहे मी करू शकतो.तु पहिल्यासारखा ट्रॅकवर ये सर्व गोष्टी शक्य आहेत 13 ते 14 वर्षात, त्यामुळे त्यांचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे,असे पृथ्वी शॉ सांगतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 8:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : मला कुणाचाच फोन आला नाही फक्त... पृथ्वीला कठीण काळात कुणी मदत केली?