Vidarbha vs Kerala :सचिन बेबीच शतक हुकलं, केरळ ऑलआऊट, विदर्भ रणजी ट्रॉफीवर नाव कोरणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Vidarbha vs Kerala,Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात केरळ संघाचा पहिला डाव ऑलआऊट झाला आहे. केरळचा कर्णधार सचिन बेबीच अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे.त्यामुळे तो 98 धावांवर ऑल आऊट झाला आहे.
Vidarbha vs Kerala,Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात केरळ संघाचा पहिला डाव ऑलआऊट झाला आहे. केरळचा कर्णधार सचिन बेबीच अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे.त्यामुळे तो 98 धावांवर ऑल आऊट झाला आहे, तसेच आदित्य सरवाटेच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर केरळ पहिल्या डावात 342 धावा करू शकली.त्यामुळे विदर्भाला दुसऱ्या डावात 37 धावांची आघाडी मिळाली आहे.
विदर्भाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 379 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केरळ संघ 342 धावांवर आटोपला आहे. केरळची सुरूवात फारशी चांगली झाली नव्हती.कारण केरळचा सलामीवीर रोहन कुन्नुमल शुन्य धावावर बाद झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या अक्षय चंद्रन आणि आदित्य सरवटे केरळचा डाव सावरला होता.
रोहन नंतर अक्षय 14 धावांवर आऊट झाला होता. आणि आदित्य सरवटे चांगली फलंदाजी करत होता त्याने अर्धशकतही झळकावलं होत पण 79 धावांवर तो आऊट झाला.त्याच्यानंतर केरळचा कर्णधार सचिन बेबीच अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे.त्यामुळे तो 98 धावांवर ऑल आऊट झाला आहे.बाकी इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नाही त्यामुळे केरळचा संघ 342 धावांवर आटोपला.
advertisement
आता विदर्भ संघाने 37 धावांची आघाडी घेतली आहे. आता विदर्भ संघासमोर अजून दोन दिवस आहे. या दिवसात ते केरळ समोर दुसऱ्या डावात किती आव्हान ठेवते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पण सामन्याला फक्त दोनच दिवस उरल्याने कदाचित हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विदर्भ संघ हा सामना जिंकण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vidarbha vs Kerala :सचिन बेबीच शतक हुकलं, केरळ ऑलआऊट, विदर्भ रणजी ट्रॉफीवर नाव कोरणार?