advertisement

168 बॉलमध्ये 252 धावा, गंभीरने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूने मॅच फिरवली, हारलेला सामना जिंकून दिला

Last Updated:

टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने दुर्लक्ष केलेल्या एका खेळाडूने अख्खी मॅच फिरवली आहे.या खेळाडूने 85 बॉलमध्ये नाबाद 120 धावांची शतकी खेळी करून संघाला हारलेला सामना जिंकून दिला आहे.

ranji trophy
ranji trophy
Ranji Trophy : रणजी ट्रॉफी सामन्यात एका पेक्षा एक रोमांचक सामने सूरू आहेत. अशाच एका सामन्यात टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने दुर्लक्ष केलेल्या एका खेळाडूने अख्खी मॅच फिरवली आहे.या खेळाडूने 85 बॉलमध्ये नाबाद 120 धावांची शतकी खेळी करून संघाला हारलेला सामना जिंकून दिला आहे. विशेष म्हणजे नुसता सामना नाही तर संघाला क्वार्टर फायनलच तिकीटही मिळवून दिलं आहे.त्यामुळे या विजयाची प्रचंड चर्चा सूरू आहे.
खरं तर पंजाबने दुसऱ्या डावात कर्नाटक समोर 252 धावांच लक्ष्य ठेवलं होतं.हे लक्ष्य गाठून कर्नाटक सामना जिंकेल असे वाटले देखील नव्हते.पण शेवटी कर्नाटकने करून दाखवले आहे. कर्नाटककडून केएल राहुल आणि कर्णधार देवदत्त पडीकल फलंदाजीसाठी आला होता. यावेळी राहुल 13 वर बाद झाला.त्यानंतर मयंक अगरवाल मैदानात आला होता.यावेळी मयंक आणि पडीकलने डाव सावरला.नंतर पुढे जाऊन मयंक अगरवाल 53 धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला.
advertisement
advertisement
मयंक बाद झाल्यानंतर अनीश आणि रविचंद्रन झटपट आऊट झाले.त्यामुळे कर्नाटक सामना गमावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कर्णधार पडीकलने डाव सावरून श्रेयस गोपालच्या मदतीने 27.5 ओलव्हरमध्ये हा सामना जिंकून दिला. या सामन्यात देवदत्त पडीकलने 85 बॉलमध्ये 120 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लावले होते. त्याच्यासोबत गोपालने 33 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर कर्नाटकने सामना जिंकला. यातला देवदत्त पडीकल मागच्या अनेक सामन्यापासून शतकीय खेळी करून टीम इंडियाचे दार ठोठावतो आहे, पण गंभीर त्याची निवडच करत नाही आहे.त्यामुळे तो दुर्लक्षित राहिलेला आहे.
advertisement
आता या विजयासह कर्नाटकने गट ब मध्ये आपला प्रवास शानदारपणे संपवला. संघाने एकूण 27 गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवली. मध्य प्रदेशने गटात अव्वल स्थान पटकावले, तर कर्नाटकने दमदार कामगिरीसह अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. आता उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकसमोर आणखी मोठे आव्हान आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
168 बॉलमध्ये 252 धावा, गंभीरने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूने मॅच फिरवली, हारलेला सामना जिंकून दिला
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement