VIDEO : पृथ्वी शॉने डबल सेंच्यूरी ठोकली, पण कुणीच विचारलं नाही, मग ऋतुराज गायकवाडने मन जिंकलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऋतुराज गायकवाडला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.त्यामुळे पृथ्वी शॉ दुर्लक्षित राहिला होता. पण ऋतुराज गायकवाडने मनाचा मोठेपणा दाखवत पृथ्वी शॉ सोबत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ranji Trophy : रणजी ट्राफी स्पर्धेत आज महाराष्ट्र संघाने चंदीगड संघाचा 144 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला आहे. महाराष्ट्राच्या या विजयात ऋतुराज गायकवाडने शतकीय आणि पृथ्वी शॉने द्विशतकीय खेळी करून मोलाची भूमिका बजावली होती.त्यामुळे ऋतुराज गायकवाडला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.त्यामुळे पृथ्वी शॉ दुर्लक्षित राहिला होता. पण ऋतुराज गायकवाडने मनाचा मोठेपणा दाखवत पृथ्वी शॉ सोबत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गायकवाडच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
खरं तर ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 116 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीमुळे महाराष्ट्राला पहिल्या डावात 300 धावांपर्यंत मजल मारता आली होती.त्यानंतर महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने 222 धावा करत डबल सेंच्यूरी केली होती. या खेळीच्या बळावर महाराष्ट्र चंदीगड समोर 464 धावांचे लक्ष्य ठेवू शकला होता.त्यामुळे पृथ्वी शॉ देखील प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार होता.पण पहिल्या डावावर रणजी सामन्याचा विजेता ठरतो,त्यामुळे ऋतुराज गायकवाडला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दिल्याचे समजते.
advertisement
Shared Glory, True Spirit 🫡
Ruturaj Gaikwad shared his Player of the Match award with Prithvi Shaw, recognising Shaw’s sensational 222-run knock that set up Maharashtra’s victory.
A gesture that speaks volumes — teamwork, respect, and mutual excellence at its best.#mca… pic.twitter.com/yMWHsW7Miq
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) October 28, 2025
advertisement
पण ऋतुराज गायकवाडला या सामन्यातील पृथ्वी शॉच योगदान माहिती होतं.तसेच त्याने जर अशी कामगिरी केली नसती तर कदाचित महाराष्ट्र संघ जिंकू शकला नसता.त्यामुळे ऋतुराज गायकवाडने पृथ्वी शॉसोबत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार शेअर करण्याचा निर्णय घेतला.
कसा रंगला सामना
ऋतुराज गायकवाडच्या शतकीय 116 धावा आणि अर्शिल कुलकर्णी आणि सौरभ नवलेच्या अर्धशतकीय धावा या बळावर महाराष्ट्र संघाने 313 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलान करताना चंदीगड 209 धावांवर ऑल आऊट झाली होती. चंदीगडकडून रमन बिश्नोई आणि निशूंर बिरला यांनी अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
चंदीगड 209 वर ऑल आऊट झाल्याने महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 104 धावांची आघाडी घेतली होती.त्यानंतर पृ्थ्वी शॉने ताबडतोड फलंदाजी करून 159 बॉलमध्ये 222 धावांची डबल सेंच्यूरी ठोकली होती. या खेळीत त्याने 29 चौकार आणि 5 षटकार मारले होते. आणि सिद्धेश वीरच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघाने 3 विकेट गमावून 359 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे 104 आघाडीच्या बळावर महाराष्ट्रने 464 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चंदीगड 209 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे महाराष्ट्र संघाने चंदीगड संघाचा 144 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 9:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : पृथ्वी शॉने डबल सेंच्यूरी ठोकली, पण कुणीच विचारलं नाही, मग ऋतुराज गायकवाडने मन जिंकलं


