RCB VS LSG : दिग्वेश राठी चिड चिड चिडला, पण पंतने दाखवलं मोठ मन,सामन्यात शेवटच्या क्षणी भयंकर ड्रामा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यात शेवटी मोठा ड्रामा झाला आहे. दिग्वेश राठीने नॉन स्ट्राईकवरील एंड वर जितेश अग्रवालला रनआऊट करण्याचा प्रयत्न केला.या रनआऊट दरम्यान अंपायरने राठीला अपीलसाठी विचारले देखील आणि त्याने होकार देखील दिला.
RCB VS LSG : आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यात शेवटी मोठा ड्रामा झाला आहे. दिग्वेश राठीने नॉन स्ट्राईकवरील एंड वर जितेश अग्रवालला रनआऊट करण्याचा प्रयत्न केला.या रनआऊट दरम्यान अंपायरने राठीला अपीलसाठी विचारले देखील आणि त्याने होकार देखील दिला. मात्र निर्णय थर्ड अंपायरकडे जात असताना रिषभ पंतने मध्यस्ती करत अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला.पंतचा हा निर्णय पाहून जितेश देखील खूश झाला.त्यामुळे रिषभ पंतच्या या कृतीने सगळ्यांची मन जिंकली होती.
खरं तर 17 व्या ओव्हरमध्ये हा ड्रामा घडला. 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दिग्वेश राठीने जितेश शर्माला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केले. राठी बॉल टाकण्याआधीच जितेशने क्रिज सोडले. त्यामुळे याचा फायदा घेऊन राठीने त्याला रनआऊट केले. अंपायरला सूरूवातीला वाटलं राठी जितेशला वॉर्निंग देत आहे. पण राठीने थेट अंपायरकडे अपील केलं.
advertisement
Rishabh Pant withdraws Digvesh Rathi's mankading run-out.
📸: JioStar pic.twitter.com/poHtccnYs1
— CricTracker (@Cricketracker) May 27, 2025
अंपायरने त्यानंतर थेट वर्ड अंपायरला डिसिजन देण्यास सांगितले."बॉलरने त्याचा डिलिव्हरी स्ट्राईड पूर्ण केला आणि पॉपिंग क्रीज पास केला," थर्ड अंपायर म्हणतात. मोठ्या स्क्रीनवर नॉट आउट चमकला होता. या दरम्यान पंतने मध्यस्थी करून अपील घेण्यास सांगितले होते.त्यानंतर जितेश शर्माने त्याची गळाभेट घेतली आणि आभार मानले होते. त्यामुळे पंतने उत्तम खेळाडू भावना दाखवली.
advertisement
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w/c), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेशसिंग राठी, आवेश खान, विल्यम ओरर्के
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 28, 2025 12:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB VS LSG : दिग्वेश राठी चिड चिड चिडला, पण पंतने दाखवलं मोठ मन,सामन्यात शेवटच्या क्षणी भयंकर ड्रामा