'शुभमनसाठी वाईट वाटलं, अजून किती सरप्राईज...', टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्कॉडवर भडकला CSK चा माजी खेळाडू, म्हणतो 'संजूची जागा...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Robin Uthappa On Shubman Gill : भारतीय क्रिकेट सध्या एका अनोख्या स्थितीत असून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालं आहे, असं मत माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने व्यक्त केलं आहे.
India squad for T20 World Cup 2026 : भारतीय क्रिकेट सध्या एका अनोख्या स्थितीत असून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालं आहे, असं मत माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने व्यक्त केलं आहे. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांसारख्या खेळाडूंना टी-20 संघातून वगळल्यानंतर उथप्पाने आपल्या युट्यूब चॅनेलवर नाराजी प्रकट केली. विशेषतः टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याला अशा प्रकारे बाहेर ठेवणं धक्कादायक असून यामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असा इशारा उथप्पाने दिला आहे.
रॉबिन उथप्पाने आपल्या चॅनेलवर म्हटलं की, "भारतीय क्रिकेट ही सध्या एक अनोखी जागा बनली आहे. आपण विचार करतो की एखादा अंदाज काम करेल आणि अचानक टीमची घोषणा होते. मी असे म्हणत नाही की ही टीम चांगली नाही. ही खूप चांगली टीम आहे, पण नक्कीच काही जणांची मने तुटली आहेत आणि अशा वेळी चांगले वाटत नाही. जो कोणी क्रिकेट खेळतो, त्याला माहित आहे की शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना किती वाईट वाटत असेल. माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहे."
advertisement
शुभमन गिलच्या निवडीवर बोलताना उथप्पा पुढे म्हणाला की, "शुभमन गिलसाठी तुम्हाला वाईट वाटतं कारण तो टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन आहे. हे खूप वाईट दृश्य आहे. मला वाटलं होतं की दुसऱ्या कोणाला तरी व्हाईस कॅप्टन बनवले जाईल, पण त्याला टीममध्ये जागा नक्कीच मिळायला हवी होती. भलेही तो प्लेइंग 11 चा हिस्सा नसता, पण तिसरा ओपनर म्हणून त्याला जागा मिळायला हवी होती. जितेशने देखील काहीही चुकीचं केलं नाही. त्याने चांगली कामगिरी केली होती."
advertisement
भारतीय संघात सध्या जे काही अनपेक्षित बदल होत आहेत, त्याबद्दल चिंता व्यक्त करताना उथप्पा म्हणाला, "संजू सॅमसनसाठी मी खूप आनंदी आहे. तो अभिषेक शर्मासोबत टॉप ऑर्डरमध्ये पोहोचला आहे. नक्कीच आपल्याला माहित नाही की अजून किती सरप्राईज समोर येतील. जर इशान किशनला ओपनिंगची संधी मिळाली तर संजूची जागा काय असेल? तुम्ही याचा अंदाज कसा लावू शकता? पण भारतीय क्रिकेटमध्ये असेच घडत आहे. संपूर्ण डोकं चक्रावून गेलं आहे."
advertisement
मैदानावर टॉस झाल्यानंतरही अनेकदा रणनीतीमध्ये बदल पाहायला मिळतात, यावर भाष्य करताना उथप्पाने खेळाडूंना धीर दिला. तो म्हणाला, "मोठी चिंतेची बाब ही आहे की काहीही होऊ शकते आणि यातून असुरक्षिततेची भावना येऊ नये, याची मला काळजी वाटते. पण हे असेच आहे. भारतीय टीमला माझ्या शुभेच्छा आहेत. मी आशा करतो की टीम इंडिया चांगली कामगिरी करेल. शुभमन आणि जितेश, हा काळ निघून जाईल. स्वतःला मजबूत ठेवा." प्रत्येक बॉल आणि प्रत्येक मॅच महत्त्वाची असून खेळाडूंनी खचून न जाता मैदानावर पुन्हा सिक्स आणि फोरची आतिषबाजी करावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'शुभमनसाठी वाईट वाटलं, अजून किती सरप्राईज...', टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्कॉडवर भडकला CSK चा माजी खेळाडू, म्हणतो 'संजूची जागा...'









