Rohit Pawar : पत्नी, सासरे अन् भाची... MCA मध्ये नातेवाईकांची मेगाभरती, केदार जाधवमुळे रोहित पवार अडचणीत! पुण्यात काय शिजतंय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Pawar MCA Controversy : केदार जाधव आणि लातूर क्रिकेट असोसिएशनचे कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
Rohit Pawar vs Kedar Jadhav : रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप पदाधिकारी केदार जाधवने गंभीर आरोप केले आहेत. 25 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या नव्या मतदार यादीत अचानक 401 नवीन आजीव सभासदांचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे जनरल बॉडीची सदस्यसंख्या 150 वरून थेट 600 च्या पार गेली आहे. या नवीन सदस्यांमध्ये 25 जण मागील कौन्सिल सदस्यांचे जवळचे नातेवाईक असून, 18 जण रोहित पवार यांचे नातेवाईक आहेत, तर 56 सदस्य त्यांच्या व्यवसायाशी किंवा वैयक्तिक कामाशी संबंधित असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (SP) 37 नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेतली नाही?
केदार जाधवने एप्रिल महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याने 'कॅटेगरी ए' मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या मते, लोढा समितीने दिलेल्या शिफारसींचे येथे सर्रास उल्लंघन होत असून, क्रिकेट प्रशासनावर विशिष्ट घराण्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवीन सदस्य बनवताना असोसिएशनच्या घटनेत सुधारणा केली नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेतली नाही, असा आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी जाधव आणि लातूर क्रिकेट असोसिएशनचे कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
advertisement
आरोप फेटाळून लावले
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या समर्थकांनी आणि MCA मधील पदाधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवीन सदस्यांची नियुक्ती ही नियमांनुसार आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील समितीने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून काही लोक विनाकारण या विषयाचे राजकारण करत असल्याचे माजी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या मतदार यादीत रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांसारख्या नावांचा समावेश असल्याने पुण्यात मुख्यालय असलेल्या या असोसिएशनमधील निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Pawar : पत्नी, सासरे अन् भाची... MCA मध्ये नातेवाईकांची मेगाभरती, केदार जाधवमुळे रोहित पवार अडचणीत! पुण्यात काय शिजतंय?










