शाब्बास पोरी! स्मृती मंधनाने रचला इतिहास, वनडेत अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला खेळाडू

Last Updated:

टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधनाने शतकीय पारी खेळून इतिहास रचला आहे. त्यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.

smriti mandhana
smriti mandhana
IND W vs AUS W : भारताच्या महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.या सामन्यात टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधनाने शतकीय पारी खेळून इतिहास रचला आहे. त्यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
advertisement
स्मृती ंधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले होते. स्मृतीने 91 बॉलमध्ये 117 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान तिने 4 गगनचुंबी षटकारासह 14 खणखणीत चौकार लगावले होते. या खेळीच्या बळावर तिने वनडे क्रिकेटमध्ये तिचे 12 वे शतक झळकावले होते.
advertisement
या शतकीय खेळीनंतर स्मृती धना ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन कॅलेंडर वर्षात तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने तिच्या दमदार फलंदाजीने हा विश्वविक्रम केला आहे. तिच्या आधी इतर कोणत्याही महिला खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम केलेला नाही. 2025 मध्ये मानधनाने तीन एकदिवसीय शतके झळकावली आहेत, 2024 मध्ये तिने केलेल्या चार शतकांचा विक्रम मागे टाकला आहे.
advertisement
स्मृती मानधनाने २०२५ मध्ये महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावा काढल्या आहेत. तिने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये एकूण 803 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 2025 मध्ये महिलांसाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा काढणारी ती खेळाडू देखील आहे. भारताची प्रतीका रावल ६५८ धावांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement
स्मृती मानधनाने 2013 मध्ये भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय पदार्पण केले. तेव्हापासून तिने 107 सामन्यांमध्ये 12 शतके आणि 32 अर्धशतकांसह एकूण 4763 धावा केल्या आहेत. ती भारतीय फलंदाजी क्रमाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

कसा रंगला सामना ?

advertisement
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मंधानाने या सामन्यात 117 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 14 चौकार लगावले होते. स्मृतीसोबत दिप्ती शर्माने 40 धावांची खेळी केली होती. या खेळाडूंच्या बळावर भारतीय संघाने 292 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने 3, अॅश्ली गार्डनरने 2 तर मेगन,एनाबेल आणि ताहिलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलान करताना ऑस्ट्रेलियाची खराब सूरूवात झाली होती. कारण ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलीसा हिली आणि जॉर्जिया वॉल स्वस्तात बाद झाली होती. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एलीस पेरीने 44 तर एनाबेलने 45 धावांची खेळी केली होती.या दोन खेळाडूं व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 190 धावांवर ऑल आऊट झाला.त्यामुळे टीम इंडियाने 102 धावांनी हा सामना जिंकला होता.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती.आता तिसरा वनडे सामना जिंकून कोण मालिका खिशात घालतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शाब्बास पोरी! स्मृती मंधनाने रचला इतिहास, वनडेत अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला खेळाडू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement