Aus vs Eng 4th Test : स्मिथला टप्पाच कळाला नाही? अ‍ॅशेसमधली सर्वात खतरनाक विकेट, Video पाहून तुम्हीही कौतूक कराल!

Last Updated:

Australia vs England 4th Test : जोश टंग याने ओव्हरमध्ये सगळे आऊट स्विंग बॉल टाकले अन् एकच बॉल इनस्विंग केला. त्यावर स्मिथची विकेट मिळाली.

Steve Smith puzzled On Josh Tongue Wicket Delivery
Steve Smith puzzled On Josh Tongue Wicket Delivery
Steve Smith puzzled On Josh Tongue : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेसमधील चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडने सगळा राग काढत ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ऑर्डर उधवस्त केली आहे. पहिल्या दिवसाच्या दोन तासातच पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली असून 32 ओव्हरच्या खेळात त्यांनी अवघ्या 91 रन्सवर 6 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आहेत. अशातच स्टिव स्मिथची विकेट खास ठरली.

बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले

सलामीवीर उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 29 रन्सचे योगदान दिले, तर ट्रेव्हिस हेड 12 रन्स करून बाद झाला. कॅप्टन स्टीव्ह स्मिथला केवळ 9 रन्स करता आले. इंग्लंडच्या जोश टंग याने घातक बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या, तर गस ॲटकिन्सनने 2 आणि बेन स्टोक्सने 1 विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले. यावेळी स्मिथला जोश टंग याचा बॉल कळालाच नाही. जोश टंग याने ओव्हरमध्ये सगळे आऊट स्विंग बॉल टाकले अन् एकच बॉल इनस्विंग केला. त्यावर स्मिथची विकेट मिळाली.
advertisement

पाहा Video

सध्या मैदानावर कॅमेरून ग्रीन 7 बॉल्स खेळून शून्य रन्सवर खेळत असून, त्याला साथ देण्यासाठी मायकेल नेसर 4 बॉल्स खेळून शून्य रन्सवर उभा आहे. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्याने आता खालच्या फळीतील फलंदाजांवर धावसंख्या सन्मानजनक स्थितीत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आहे. या मॅचचा रन रेट सध्या 2.84 इतका कमी असून ऑस्ट्रेलियन टीम मोठ्या संकटात सापडली आहे.
advertisement
दरम्यान, पहिले तीन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका खिशात घातली आहे. अशातच आता इंग्लंडला मालिकेत लाज राखण्यासाठी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Aus vs Eng 4th Test : स्मिथला टप्पाच कळाला नाही? अ‍ॅशेसमधली सर्वात खतरनाक विकेट, Video पाहून तुम्हीही कौतूक कराल!
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement