Team India : रोहित रिटायर होताच दिवस फिरले, मॅच विनरला टीम इंडियातून डच्चू, वर्ल्ड कपमध्ये करतोय कॉमेंट्री!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया युएसएविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळली.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी टीम इंडिया युएसएविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळली. या सामन्यात 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा सदस्य कॉमेंट्री करताना दिसला. मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेला हा खेळाडू निवृत्त झालेला नाही, पण तरी कॉमेंट्री करत आहे.
टीम इंडियाने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला, या टीममध्ये लेग स्पिनर युझवेंद्र चहल होता, पण त्याला मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्मा टी-20 मधून निवृत्त झाल्यानंतर युझवेंद्र चहलही टीममधून बाहेर गेला आणि आता त्याने कॉमेंट्रीमध्ये त्याची नवी इनिंग सुरू केली आहे.
advertisement
2023 साली युझवेंद्र चहल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, यानंतर त्याला संधी दिली गेली नाही. मागच्या काही काळात चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही वादात होता. चहलने 80 टी-20 सामन्यांमध्ये 25.09 च्या सरासरीने 96 विकेट घेतल्या आहेत. तर 72 वनडेमध्ये चहलच्या नावावर 121 विकेट आहेत.

advertisement
सूर्या एकटा नडला
युएसएविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडिया अडचणीत असताना वादळी खेळी केली. 77 रनवर 6 विकेट गेलेल्या असताना सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये 84 रनची खेळी केली, त्यामुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 161 रन केल्या. मॅचच्या सुरूवातीलाच टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या रुपात धक्का लागला. ताप आल्यामुळे बुमराह पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. बुमराहच्या ऐवजी 24 तासांपूर्वीच टीममध्ये आलेल्या मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळाली. हर्षित राणाला दुखापत झाल्यामुळे तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला, त्यामुळे राणाऐवजी मोहम्मद सिराजचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत या ग्रुपमध्ये युएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स आहे. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सुपर-8 मध्ये प्रवेश करतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 9:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : रोहित रिटायर होताच दिवस फिरले, मॅच विनरला टीम इंडियातून डच्चू, वर्ल्ड कपमध्ये करतोय कॉमेंट्री!










