Asia Cup 2025 final : '...तर आज रात्रीच टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचणार', पाहा समीकरण!

Last Updated:

Team india into the Asia cup Final : आशिया कप 2025 च्या सुपर 4 स्टेजमध्ये भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे. जर आजच्या मॅचमध्ये भारताने बांगलादेशला हरवल्यास त्यांचे फायनलमधील स्थान निश्चित होईल.

Team india into the Asia cup Final
Team india into the Asia cup Final
Asia Cup 2025 final : आशिया कपच्या सुपर-4 मधील चुरस आता रंगतदार झाली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता सूर्यकुमारच्या टोळीसमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. अशातच आता टीम इंडिया आजच्या सामन्यात जिंकून फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आजचा सामना जिंकली तर थेट फायनलमध्ये जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असं का म्हटलं जातंय? जाणून घेऊया.

बांगलादेशचा पराभव केल्यास टीम इंडिया...

भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ आहेत. भारतीय टीमने यापूर्वीच एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. उद्याच्या मॅचमध्ये विजय मिळवून 4 पॉइंट्ससह थेट फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचं लक्ष्य आहे. बांगलादेशचा आज पराभव केल्यास टीम इंडियाच्या खात्यात चार गुण दिसतील. त्यामुळे फायनलचं तिकीट तर निश्चित होईल. पण टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या पहिल्या क्रमांकावर असेल की दुसऱ्या हे निश्चित असणार नाही.
advertisement

श्रीलंका आजच बॅग भरणार

जर आज टीम इंडिया जिंकली तर श्रीलंकेला आजच बॅग पॅक करून मायदेशी रवाना व्हावं लागेल. पण बांग्लादेश आज जिंकली तर श्रीलंकेच्या आशा जिवंत राहतील. बांगलादेशने आज सामना जिंकला तर बांगलादेशचं सेमीफायनल तिकीट निश्चित होणार आहे. तर बांगलादेशच्या विजयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सैमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
advertisement
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - सैफ हसन, तंजीद हसन, लिटन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), तौहीद ह्रदय, शमीम हुसैन, जाकिर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, तंजीम हसन आणि मुस्तफिजुर रहमान.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 final : '...तर आज रात्रीच टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचणार', पाहा समीकरण!
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement