October Ekadashi 2025: ऑक्टोबर महिन्यात कधी-कधी एकादशी तिथी; पाहा धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त-विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
October Ekadashi 2025: ऑक्टोबर महिन्यात पापांकुशा एकादशी असेल. त्यानंतर येणारी दुसरी एकादशी रमा एकादशी असेल. या दोन्ही एकादशींना खूप धार्मिक महत्त्व आहे. या एकादशींची तिथी आणि शुभ वेळ जाणून घेऊया.
मुंबई : एकादशी तिथीला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना शाश्वत पुण्य मिळतं. एका महिन्यात दोन एकादशी असतात. ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या एकादशींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ऑक्टोबर महिन्यात पापांकुशा एकादशी असेल. त्यानंतर येणारी दुसरी एकादशी रमा एकादशी असेल. या दोन्ही एकादशींना खूप धार्मिक महत्त्व आहे. या एकादशींची तिथी आणि शुभ वेळ जाणून घेऊया.
पापांकुशा एकादशी - वैदिक कॅलेंडरनुसार, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:11 वाजता सुरू होते. ती 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:31 वाजता संपेल. पापांकुशा एकादशीचं व्रत 3 ऑक्टोबर रोजी पाळलं जाईल. पापांकुशा एकादशीला सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट लाभ होतो. विष्णू कृपा मिळते.
advertisement
पापांकुशा एकादशीचं महत्त्व - पापांकुशा एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे जीवनात सुख आणि शांती देखील मिळते. या व्रतामुळे मृत्यूंच भय आणि नरक लोक मिळण्याच्या भीतीपासूनही मुक्ती मिळते आणि भाविकांना मोक्ष मिळतो.
रमा एकादशी कधी?
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:34 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:11 वाजता ती संपेल. दिनदर्शिकेनुसार, रमा एकादशीचं व्रत 17 ऑक्टोबर रोजी पाळलं जाईल.
advertisement
रमा एकादशी शुभ मुहूर्त 2025 - रमा एकादशीला अभिजित मुहूर्त सकाळी 11:43 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:29 पर्यंत असेल. याकाळात तुम्ही भगवान विष्णूची पूजा करू शकता.
रमा एकादशीचं महत्त्व - रमा एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो, घरात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्याचा अभाव दूर होतो. हे व्रत केल्यानं व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि आध्यात्मिक प्रगती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
October Ekadashi 2025: ऑक्टोबर महिन्यात कधी-कधी एकादशी तिथी; पाहा धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त-विधी