advertisement

Ayush Mhatre : मुलाने वर्ल्ड कप जिंकला, 14 वर्षांपूर्वीच्या आठवणीने आयुषचे वडील भावुक, अस्सल मराठमोळी प्रतिक्रिया

Last Updated:

अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आहे. सहाव्यांदा टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे.

मुलाने वर्ल्ड कप जिंकला, 14 वर्षांपूर्वीच्या आठवणीने आयुषचे वडील भावुक, अस्सल मराठमोळी प्रतिक्रिया
मुलाने वर्ल्ड कप जिंकला, 14 वर्षांपूर्वीच्या आठवणीने आयुषचे वडील भावुक, अस्सल मराठमोळी प्रतिक्रिया
मुंबई : अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आहे. सहाव्यांदा टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारताने दिलेल्या 412 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 311 रनवर ऑलआऊट झाला. वैभव सूर्यवंशीच्या 175 रन आणि कर्णधार आयुष म्हात्रेने केलेल्या अर्धशतकामुळे टीम इंडियाने फायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.
मुलाच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुष म्हात्रेचे वडील भावुक झाले. 14 वर्षांपूर्वी वयाच्या 5 व्या वर्षी आयुषने हातात बॅट पकडली, आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे, असं आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी दिली आहे.

काय म्हणाले आयुषचे वडील?

'या जल्लोषासाठी आम्ही इतकी वर्ष मेहनत करत होतो, आज या मेहनतीला यश आलं आहे. ही लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे, कारण तुम्हाला अंडर-19 वर्ल्ड कप एकदाच खेळायला मिळणार आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याने क्रिकेटची बॅट हातात पकडली होती. भारताच्या टीमचं नेतृत्व करून तो भारतासाठी वर्ल्ड कप घेऊन आला आहे. हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही', असं आयुषचे वडील म्हणाले आहेत.
advertisement
'मुंबई, महाराष्ट्र आणि देशासाठी हा अभिमान आहे. तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली, तर तुम्ही विश्वविजेते होऊ शकता, ते आज आयुषने करून दाखवलं आहे. आयुष सामान्य घरातून आलेला मुलगा आहे, त्याला अनेकांनी पाठिंबा दिला. पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचं यात योगदान आहे. या योगदानाच्या जोरावर आयुषने वर्ल्ड कप जिंकला आहे', अशी प्रतिक्रिया आयुषच्या वडिलांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ayush Mhatre : मुलाने वर्ल्ड कप जिंकला, 14 वर्षांपूर्वीच्या आठवणीने आयुषचे वडील भावुक, अस्सल मराठमोळी प्रतिक्रिया
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement