Yashasvi Jaiswal : जयस्वालच्या मुंबई सोडण्याची INSIDE STORY, दिग्गज खेळाडूने सगळंच सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जयस्वालची मुंबई सोडण्याची काही वेगळी कारणे देखील आहे. जसं कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत झालेला पंगा आहे. पण आता मुंबईच्या एका माजी खेळाडूने जयस्वालच्या मुंबई सोडण्याच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
Yashasvi Jaiswal Story : टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने मुंबईची साथ सोडली आहे. त्यामुळे आता तो रणजी ट्रॉफी सामन्यात गोवा संघाकडून खेळताना दिसणार आहे.या गोवा संघाने त्याला कर्णधारपदाची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. पण जयस्वालची मुंबई सोडण्याची काही वेगळी कारणे देखील आहे. जसं कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत झालेला पंगा आहे. पण आता मुंबईच्या एका माजी खेळाडूने जयस्वालच्या मुंबई सोडण्याच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.
यशस्वी जयस्वालचा मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघात जाण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. तसेच गोवा जयस्वालला मुंबईचा संघ सोडण्याचा बदल्यात काय देते,हे फारसे महत्वाचे नाही आहे. पण तो ज्या (23 व्या) वयात मुंबई सोडतो आहे.पण तो 34-35वर्षाचा असता तर त्याने हा निर्णय घेतला असता तर तो योग्य असता, असे मुंबईचा माजी खेळाडू वसीम जाफरने म्हटले आहे.
advertisement
वसीम जाफर पुढे म्हणाला,जयस्वालला त्यामुळे (मुंबई संघ व्यवस्थापनाशी असलेल्या मतभेदांमुळे) हा निर्णय घेण्यास प्रवृत्त केले असेल, परंतु मला वाटते की मुंबई सोडणे हा एक धक्कादायक निर्णय आहे. ज्याने आतापर्यंत अंडर-१४ पासून मुंबईसाठी खेळले आहे आणि गोवा हा एक प्लेट-ग्रुप संघ आहे जो नुकताच एलिट ग्रुपमध्ये आला आहे. त्याला तिथे जाऊन खेळण्यासाठी, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कितीही वेळ घालवला तरी, मला आश्चर्य वाटते की त्याने इतक्या लवकर हा निर्णय घेतला."
advertisement
"पण त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याचा विचार करू नये. त्याच्यासारख्या व्यक्तीसाठी, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळले पाहिजे. त्याचे लक्ष त्यावर असले पाहिजे. मला खात्री आहे की हा निर्णय त्याच्या मनात असेल कारण हे एक-दोन आठवड्यात घडणार आहे," असे जाफरने इसपीएन क्रिकइन्फोनवर म्हटले आहे.
दरम्यान यशस्वीने मुंबई सोडल्यावर त्याच्यावर अनेक आरोप झाले आहेत.जसे जयस्वालच अजिंक्यशी पंगा घेतला. तसेच त्याच्या किटबॅगला देखील लाथ मारली, अशाप्रकारचे आरोप जयस्वालवर झाले होते.त्यामुळे आता या आरोपांवर जयस्वाल काय उत्तर देतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : जयस्वालच्या मुंबई सोडण्याची INSIDE STORY, दिग्गज खेळाडूने सगळंच सांगितलं